शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (12:44 IST)

दिवाळी विशेष पदार्थ : ड्रायफ्रुट्सची चविष्ट करंजी

दिवाळीनिमित्त लक्ष्मी पूजनासाठी ड्रायफ्रूट्स ची करंजी बनवा. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या. 
 
साहित्य - 
100 ग्राम खवा, 1 वाटी मैदा, 1/4 वाटी साजूक तूप (मोयनसाठी ), 100 ग्राम बदाम तुकडी, 10 ग्राम पिठी साखर, 1/2 वाटी मिक्स ड्राय फ्रुट्स, 1/2 लहान चमचा वेलची पूड, तळण्यासाठी तूप, थोडंसं दूध,
 
कृती- 
सर्वप्रथम बदामाची तुकडी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यावरून साली काढून मिक्सरमध्ये वाटून पेस्ट बनवून घ्या. आता एका कढईत थोडंसं तूप घालून बदामाची पेस्ट गुलाबी रंग येई पर्यंत परतून घ्या. थंड झाल्यावर त्यात खवा, पिठी साखर, ड्रायफ्रूट्स, वेलची पूड, मिसळून घ्या. आता मैद्यात मोयन घालून घट्ट कणिक मळून घ्या. अर्धा तास कपड्याने झाकून ठेवा. नंतर कणकेला एकसारखे मळून त्याच्या लहान लहान गोळ्या बनवा आणि पुरी प्रमाणे लाटून घ्या .आता एक लहान चमचा करंजीचे सारण या पुरीच्या मध्ये भरून घ्या. आता पुरीच्या  एका  बाजूने हे मिश्रण कव्हर करुन  घ्या आणि पुरीच्या कडेला दुधाचा हात लावून कडे चिकटवून घ्या. अशा प्रकारे सर्व करंज्या तयार करून घ्या. 

आता कढईत तूप गरम करण्यास ठेवा आणि त्यात या तयार करंज्या तळून घ्या .थंड झाल्यावर करंजी खाण्यासाठी सर्व्ह करा.नंतर  हवाबंद डब्यात भरून ठेवा.