1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By

Diwali Special Nashik chivda Recipe : नाशिकचा खमंग चिवडा रेसिपी

दिवाळी आली की दिवाळी साठी फराळ करण्याची तयारी सुरु होते. लाडू, चिवडा, शंकरपाळी, करंज्या, चकल्या, अनारसे, सर्व फराळाचे साहित्य बनवायला गृहिणी लागतात. दिवाळीच्या फराळासाठी नाशिकचा चिवडा नसेल तर खाद्य पदार्थ अपूर्ण वाटतात. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 

साहित्य-
500 ग्रॅम भाजके पोहे, चण्याच्याडाळी ,शेंगादाणे,खोबर्‍याचे काप, चिरून वाळवलेला कांदा, लाल तिखट,मीठ चवीनुसार, लवंंग, दालचिनी, जीरे, शहाजीरे, तीळ,1 तमालपत्र,1/4 टीस्पून हिंग,1/2 कप तेल, 1/2 टीस्पून मोहरी -जीरे, 1/4 टीस्पून आमसूल पावडर , 1/4 कप काजू व किशमिश,कडीपत्ता.
 
कृती -
सर्वप्रथम कढईत तेल तापवून कांदा लालसर परतून घ्या, सर्व खडे मसाले परतून घ्या नंतर थंड करून वाटून घ्या, आता तेलात शेंगदाणे, डाळी, काजू, किशमिश, कडीपत्ता, कांदा घालून परतून घ्या. आता कढईत फोडणी तयार करून त्यात बारीक वाटलेला खडा मसाला आणि शेंगदाणे सर्व साहित्य घालून भाजके पोहे घालून मिसळा त्यात आमसूल पावडर, घालून चांगले मिसळा आणि 3-4 मिनिटे खमंग कुरकुरीत होण्यासाठी ठेवा नाशिकचा खमंग चिवडा तयार.नंतर थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. चहा सह सर्व्ह करा 
 
 
Edited By - Priya Dixit