दिवाळी फराळ करिता बनवा पोह्यांचा चिवडा
साहित्य-
250 ग्रॅम भाजके पोहे
250 ग्रॅम शेंगदाणे
100 ग्रॅम खोबऱ्याचे पातळ काप
100 ग्रॅम डाळ
10 ते 12 मिरच्या
250 ग्रॅम तेल
चवीनुसार मीठ
लाल तिखट
हळद
धणे पूड
1 चमचा पिठीसाखर
कढीपत्ता
कृती-
पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे स्वच्छ चाळणीने चाळून घ्यावे.आता एका मोठ्या कढईमध्ये भाजून घ्यावे. आता मोठ्या पातेल्यात तेल घालून त्यात कढीपत्त्याची पाने, मिरच्या घालून परतवून घ्यावे. आता त्यामध्ये हळद, तिखट, धणेपूड व दाणे घालून घ्यावे. तसेच दाणे खमंग परतले कि खोबर्याचे काप व डाळ घालून परतावे. आता तयार झालेल्या या फोडणीमध्ये भाजलेले पोहे घालावे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ व पिठी साखर घालून चिवडा परतवून घ्यावा. तर चला तयार आहे आपला दिवाळी विशेष पोह्यांचा चिवडा, थंड झाल्यानंतर डब्ब्यात भरावा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik