काश्मिरी बदामी कहवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल
काश्मिरी कहवा किंवा बदाम कहवा शरीरासाठी खूप चांगले आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे फायदेशीर ठरु शकतं.
काश्मीरमधील लोक न्याहारीच्या वेळी बदाम कहवा पितात ज्यात हिरव्या चहाची पाने, दालचिनी, वेलची, केशर आणि लवंगा यासारख्या अनेक गोष्टी मिसळल्या जातात. चविष्ट बनवण्यासाठी त्यात बदाम, अक्रोड आणि ड्रायफ्रूट्स मिसळले जातात.
काश्मिरी बदामी कहवाचे गुणधर्म
यात अँटिऑक्सिडेंट आणि अँटीजेनोटॉक्सिक गुणधर्म असतात तसेच प्रभाव गरम असल्याने व्हायरल इन्फेक्शन टाळण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
काश्मिरी कहवा प्यायल्याने इम्युनिटी स्ट्रांंग होते. ताण दूर होतो. अँटी-ऑक्सिडंट्सच्या गुणधर्मामुळे कॅन्सरपासूनही बचाव करते.
त्वचेसाठीही फायदेशीर आहे. याने त्वचा मुलायम आणि कोमल बनते.
बदामाच्या सेवनाने शरीरातील प्रोटीनची कमतरताही पूर्ण होते.
काश्मिरी बदामी कहवा कसा बनवायचा
बदाम-अक्रोड बारीक चिरून घ्यावे. भांड्यात एक ग्लास पाणी घेऊन त्यात दालचिनी, वेलची आणि केशर उकळवावे आणि घट्ट होऊ लागल्यावर ग्रीन टीची पाने टाकावी आणि हे पाणी पुन्हा उकळावावे. कपात गाळून घ्यावे आणि बदाम आणि अक्रोडाच्या तुकड्यांनी सजवावे. गरमागरम पेयचा आनंद घ्यावा.