साहित्य : साधारण थोडी व आंबुस सफरचंद 4-5, कॉर्नफ्लोअर 2 चमचे, 1 चमचा लिंबाचा रस, 1/2 चमचा दालचिनी पूड, मीठ, थंड पाणी 1 कप, साखर अर्था कप, जिरेपूड चिमूटभर.
कृती : सर्वप्रथम सफरचंद स्वच्छ धुवावित. आतील बिया काढाव्यात. सफरचंदाची साल न काढता तुकडे साधारण बारीक करावेत. किसलेले लिंबू व सफरचंदाचे तुकडे पाण्यात टाकावेत. 15-20 मिनिट हे पाणी उकळावे व पाणी गाळणीने गाळून घ्यावे. नंतर थोड्या पाण्यात कॉर्नफ्लोअर चोपडा गाठी न होऊन देता कालवून वरील पाण्यात मिसळावा. सर्व पाण्याचे मिश्रण सारखे ढवळून एकजीव करा. नंतर त्यात साखर, मीठ, दालचिनी पूड, जिरेपूड टाकून मंदाग्नीवर थोडा वेळ ठेवा. गरम झाल्यावर कढई किंवा पातेले खाली उतरवा. हे फळाचे सूप फारच रुचकर लागते.