शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (13:34 IST)

दसरा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक

आश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करतात. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. आज आपणया सणाचे महत्त्व जाणून घेऊया.
 
दसर्‍याला दशहरा असेही म्हणतात. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीचे नऊ दिवस देवीने असुरांशी युद्ध करून आणि दहाही दिशांवर नियंत्रण मिळवले. तोच हा दिवस !
 
त्रेतायुगात प्रभू श्रीरामचंद्राने याच दिवशी रावणाचा वध केला आणि रावणावर विजय मिळवला, म्हणजे विजयाचा दिवस म्हणून याला विजयादशमी असेही म्हणतात. 
 
द्वापरयुगात पांडवांनी अज्ञातवास संपताच याच दिवशी शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रे परत घेतली होती.
 
पूर्वी मराठे वीर शत्रूचा प्रदेश जिंकून सोन्या-नाण्याच्या रूपात संपत्ती घरी आणून ती देवासमोर ठेवत आणि मोठ्यांना नमस्कार करीत. ती प्रथा आपण आपट्याची पाने सोने म्हणून वाटतो.
 
या दिवशी राजे आपल्या शस्त्रांची पूजा करतात. प्रत्येक शस्त्रामध्ये देव आहे, या श्रद्धेने आपण शस्त्रांची पूजा करायची असते.

या दिवशी शेतकरी आपल्या शेतीत साहाय्य करणार्‍या अवजारांची पूजा करतात.
 
विद्यार्थी आपल्या वह्या-पुस्तकांची पूजा करतात. कारण विद्यार्थी जीवनातील ही शस्त्रेच आहेत. तसेच या प्रत्येकात देव आहे. या दिवशी विद्यार्थ्यांनी वह्या, पुस्तके, लेखणी या सर्वांची पूजा करायला हवी. विद्यार्थी जीवनातील ही शस्त्रे सरस्वतीमातेचे प्रतीक आहेत. आपण आपल्या जीवनातील ज्ञानग्रहण करायला साहाय्य करणार्‍या सर्व शस्त्रांचे या दिवशी मनोभावे पूजन करावे.