1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रहण
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मार्च 2025 (16:10 IST)

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

Solar Eclipse
Solar Eclipse 2025 या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण फाल्गुन अमावस्येच्या दिवशी म्हणजेच २९ मार्च, शनिवारी होईल. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी २:२१ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६:१४ वाजता संपेल. ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​५३ मिनिटे असेल.
 
Partial Solar Eclipse यावेळी सूर्यग्रहण हे आंशिक सूर्यग्रहण असेल, म्हणजेच सूर्य पूर्णपणे झाकला जाणार नाही, तर त्याचा फक्त एक भाग काळा दिसेल.
 
भारतात सूर्यग्रहण दिसेल का?
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ वैध राहणार नाही. साधारणपणे सुतक काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, परंतु हे ग्रहण भारतात प्रभावी नसल्यामुळे, लोक त्यांचे दैनंदिन काम कोणत्याही अडथळ्याशिवाय करू शकतात.
 
तथापि हे ग्रहण दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, उत्तर आशिया, युरोप, वायव्य आफ्रिका, उत्तर ध्रुव आणि अटलांटिक महासागरात दिसेल.
 
सूर्यग्रहणाच्या वेळी काय करावे आणि काय करू नये?
सूर्यग्रहणाच्या वेळी काय करावे?
ग्रहण दरम्यान मंत्र जप आणि ईश्वराचे ध्यान करावे. हे सकारात्मक ऊर्जा वाढविण्यास मदत करतं. सूर्य ग्रहण संपल्यावर स्नान करावे आणि घरात गंगाजल शिंपडावे ज्यानेकरुन नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.
 
सूर्यग्रहणाच्या वेळी काय करु नये?
ग्रहण दरम्यान भोजन आणि पाण्याचे सेवन करु नये. विशेषकरुन गर्भवती महिला आणि आजरी व्यक्तींचे लक्ष ठेवावे. केस, नखे आणि दाढी काढू नये. खोटे बोलणे, झोपणे आणि कोणत्याही प्रकाराचे कोणत्याही प्रकारचे अनैतिक काम टाळा. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी शिवणकाम किंवा भरतकाम करू नये.
मीन राशीत सूर्यग्रहण असल्याने त्याचा काय परिणाम होईल हे जाण़न घ्या
यावेळी सूर्यग्रहण मीन आणि उत्तरभाद्रपद नक्षत्रात होईल. ग्रहणाच्या वेळी, सूर्य आणि राहूसह, शुक्र, बुध आणि चंद्र देखील मीन राशीत असतील, ज्यामुळे या ग्रहणाचे महत्त्व आणखी वाढेल.
 
 वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह योग अशुभ मानला जातो, कारण तो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात संभाव्य अडचणी आणि आव्हाने दर्शवितो.
 
डिस्क्लेमर: हा लेख धार्मिक श्रद्धेवर आधारित असून केवळ माहिती प्रदान करण्यासाठी दिला जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणतेही उपाय किंवा उपासनेच्या पद्धतीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.