रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रहण
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (12:40 IST)

ग्रहण सुटल्यावर काय करावे

Chandra Grahan 2022 आज कार्तिक पौर्णिमा तिथीला वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल, जे देशात आणि जगात पाहता येईल. हे चंद्रग्रहण भारतात अंशतः दिसणार आहे, परंतु देशाच्या पूर्वेकडील काही भागात चंद्रोदयाच्या वेळी संपूर्ण चंद्रग्रहण दिसेल. 08 नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच ग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होईल. भारतात ग्रहण असल्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध असेल. सुतकामध्ये शुभ कार्य आणि सर्व प्रकारचे धार्मिक विधी निषिद्ध आहेत. यावेळी सर्व मंदिरांचे दरवाजे बंद असतात. ग्रहण संपल्यावरच सुतक संपतं, मग घरोघरी गंगाजल शिंपडून आणि स्नान करून मंदिरात पूजा केली जाते. ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. जाणून घेऊया वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणातील सर्व खास गोष्टी...
 
चंद्रग्रहण दरम्यान काय करावे
ग्रहण सुरू होण्याआधी, म्हणजेच जेव्हा सुतक चालू असेल तेव्हा आधीच तोडलेली तुळशीची पाने अन्नपदार्थांमध्ये ठेवावीत.
ग्रहणकाळात आपल्या इष्ट देवतांच्या नावांचे स्मरण करावे.
ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी ग्रहण काळात मंत्रांचा जप करावा.
ग्रहण संपल्यानंतर घरभर गंगाजल शिंपडावे.
 
चंद्रग्रहण काळात हे काम करु नका
ग्रहणकाळात देवी-देवतांचे कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा करू नये.
ग्रहणकाळात अन्न शिजवू नये, खाऊ किंवा पिऊ नये.
गरोदर महिलांनी ग्रहण पाहू नये किंवा ग्रहण काळात घराबाहेर पडू नये.
ग्रहण काळात तुळशीसह इतर झाडांना स्पर्श करू नये.
 
ग्रहण सुटल्यावर हे करा
चंद्रग्रहण काळावधी संपल्यावर सुतकही संपतं. ग्रहण संपल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिंपडा. घर, दुकान, आस्थापना स्वच्छ करा आणि ते चांगले धुवा. असे मानले जाते की गंगाजल किंवा कोणत्याही पवित्र नदीचे पाणी शिंपडल्याने नकारात्मकता संपते आणि ग्रहणाचा प्रभावही संपतो. ग्रहणानंतर स्नान करावे. जर तुम्ही स्नान करू शकत नसाल तर स्वतःवर गंगाजल शिंपडा. स्वत: स्नान करुन देवतांना स्नान घाला. मंदिर स्वच्छ करा. यानंतर अन्नपदार्थांवर गंगाजल शिंपडून ते शुद्ध करा.