गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. वाचकांची पत्रे
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (15:32 IST)

राज ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट

Raj Thackeray
परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. राज ठाकरे हे जामीन करून देखील वेळोवेळी बजावलेल्या तारखांना सतत गैरहजर राहिले आहेत. हे कारण सांगत परळी कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधात आजीमपात्र वॉरंट जारी केले आहे. 
 
2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी कोर्टात केस सुरु आहे. जवळपास 13-14 वर्ष जुन्या खटल्यात आजही राज ठाकरेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आठ वर्षांपूर्वी बीडमधील अंबाजोगाईत मनसे कार्यकर्त्यांनी एसटी बसचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे सुनावणीला हजर राहत नव्हते.
 
दुष्काळी दौऱ्याच्या निमित्ताने दौऱ्यावर निघालेल्या राज ठाकरे यांनी सहा वर्षांपूर्वी अंबाजोगाईत हजेरी लावली होती. न्यायालयात जाऊन त्यांनी त्यावेळी तीनशे रुपयांचा दंड भरत अटक वॉरंट रद्द केले होते. या प्रकरणी परळी न्यायालयाने जामीन दिला.