शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (09:50 IST)

निबंध रंगांचा सण होळी

होळी असा सण आहे जो सर्व धर्माचे लोक आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. होळी सण हा सर्वधर्म समभाव चा संदेश देण्याचा सण आहे. या दिवशी लहान मोठे सर्व आनंदात आणि उत्साहात असतात. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी लोक जुन्या तक्रारी आणि मतभेद विसरून एक मेकांना गुलाल लावतात. गळा भेट घेतात. होळीशी अनेक कथा देखील जुडलेल्या आहे. होळी ज्याला धुळवड देखील म्हणतात. धुळवडीच्या आदल्या रात्री होळी पेटवतात .या मागील पौराणिक कथा देखील आहे. 

भक्त प्रह्लाद याचे वडील हिरण्यकश्यप स्वतःला देव मानायचा हिरण्यकश्प विष्णूंचा विरोधी होता.तर त्याचा मुलगा म्हणजे प्रह्लाद हे भगवान विष्णूंचे भक्त होते. हिरण्यकश्यपने प्रह्लादाला भगवान विष्णूंची पूजा करण्यापासून रोखले. त्यांनी ऐकले नाही तर प्रह्लाद ला मारण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्रह्लादाच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. शेवटी  प्रह्लादाच्या वडिलांनी म्हणजेच  हिरण्यकश्यपनी आपली बहीण होलिका ला बोलवून सगळे सांगितले की तू प्रह्लाद ला आपल्या मांडीवर  घेऊन आगीत बस. म्हणजे प्रह्लाद त्या अग्निमध्ये भस्म होईल.

होलिकेला वरदान मिळाले होते की अग्नी तिचे काहीच करू शकणार नाही. त्या मुळे होलिकेला अग्नीचे काहीच भय नव्हते. ठरलेल्या प्रमाणे होलिका प्रह्लाद ला आपल्या मांडीवर घेऊन अग्निमध्ये बसली. प्रह्लाद तर भगवान विष्णूंचे नामस्मरण करू लागला आणि त्या अग्नीतून जिवंत वाचून गेला. परंतु त्या अग्नीत होलिका भस्मसात झाली. 

ही गोष्ट सांगते की वाईटावर नेहमी चांगल्याचा विजय असतो. आज देखील फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमे ला होलिका दहन केले जाते.पुरण पोळीचा नेवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी धुळवड खेळतात. या दिवशी सर्व लोक एकमेकांना अबीर,गुलाल, रंग लावतात. हा रंगांचा सण आहे. या दिवशी लोक आपल्या नातेवाईकांकडे जाऊन एकमेकांना रंग लावतात. होळी खेळतात.लहान मुलं तर खूप उत्साहात असतात. पिचकारीने फुग्याने धुळवड किंवा होळी खेळतात.    

प्रत्येक जण आपसातील मतभेद द्वेष विसरून गळाभेट घेतात. घरातील स्त्रिया एक दिवसापूर्वीच करंज्या (गुझिया), मिठाई बनवितात आणि आपल्या शेजारी मिठाई देतात. ब्रज , वृंदावन ,मथुरा, बरसाना,काशीची होळी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.  

आजकाल चांगल्या प्रतीचे रंग बाजारात येत नाही .या  रंगांमध्ये घातक रसायने मिसळली जातात. या मुळे चेहऱ्याला, त्वचेला, डोळ्यांना त्रास होतो. हे चुकीचे आहे. या दिवशी लोक मद्यपान करून देखील चुकीचे वागतात.हे चुकीचे आहे हा सण आनंदाचा, उत्साहाचा ऐक्याचा सण आहे. हा सण मर्यादेत राहून खेळला पाहिजे.मुलांनी देखील मोठ्याच्या देखरेखी खाली सावधगिरी बाळगून हा सण साजरा करावा. फुग्यांचा वापर करू नये. या फुग्यांमुळे काहीही अपघात घडू शकतात. डोळ्यांना इजा देखील होऊ शकते. म्हणून अति उत्साहात येऊन असे काहीही करू नये ज्यामुळे कोणाला त्रास होईल. हा आनंदाचा सण सौजन्याने साजरा करावा. आणि सणा चा आनंद सगळ्यांसह घ्यावा.