शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (11:54 IST)

दसरा मराठी निबंध Marathi essay on Dasara

दसरा किंवा विजयादशमीचा सण असत्यावर वर सत्याचा विजय म्हणून साजरा करतात. हा सण भारतीय संस्कृतीचा वीर उपासक, शौर्याचा उपासक आहे. आश्विन शुक्ल दशमीला साजरा केला जाणारा दसरा म्हणजे आयुध किंवा शस्त्र पूजा हिंदूंचा मुख्य सण आहे. माणसाच्या आणि समाजाचा रक्तात शौर्य प्रकट व्हावं म्हणून दसऱ्या चा सण साजरा केला जातो.
 
* असत्यावर सत्याचा विजय -
भगवान रामाने या दिवशी रावणाचा वध केला होता. या सणाला असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. म्हणून या दशमी ला विजयादशमी च्या नावाने ओळखतात. दसऱ्या किंवा विजयादशमीचा सण मोठ्या थाटामाटाने दणक्यात साजरा केला जातो. दसरा वर्षाच्या तीन सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. इतर दोन आहे चैत्र शुक्लची आणि कार्तिक शुक्लची प्रतिपदा. या दिवशी लोकं नवीन काम सुरू करतात. या दिवशी शस्त्राची आणि वाहनांची पूजा करतात.
 
प्राचीन काळात राजा या दिवशी विजयची इच्छा करून आणि त्या साठी देवाकडे प्रार्थना करून युद्ध यात्रे साठी जात असे. दसऱ्याचा सण दहा प्रकारचे पाप, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अंहकार, आळस, हिंसा आणि चोरी या सारख्या अवगुणांना सोडण्यास प्रवृत्त करतं.
 
दशहरा शब्दाची निर्मिती - दशहरा किंवा दसरा हा शब्द
दश (दहा) आणि 'अहन' शब्दापासून बनला आहे. दसरा सणाच्या उत्पत्तीच्या विषयी बऱ्याच आख्यायिका आहेत. काहींच्या मतानुसार हा सण शेतीचा सण आहे. दसऱ्याच्या सणाला सांस्कृतिक पैलू देखील आहे.
 
भारत हा एक कृषिप्रधान म्हणजे शेतकर्‍याचं देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पीक पेरून धान्य रुपी धनाला आपल्या घरात घेऊन येतो त्या वेळी त्याच्या उत्साहाला आणि आनंदाला पारावर नसतो. या आनंदाच्या प्रसंगी तो देवाची कृपा समजतो आणि त्याचा साक्षात्कार करण्यासाठी त्याला आवळतो त्याची उपासना करतो. तर काही लोकांच्या मते हे रण यात्रेचे प्रतीक आहे, कारण या वेळी पावसाळा संपतो, नदीचा पूर देखील शांत होतो, धान्य साठवून ठेवले जाते.
 
या सणाचा संबंध नवरात्राशी देखील आहे. कारण नवरात्राच्या नंतरच हा सण साजरा करतात आणि या सणामध्ये महिषासुराच्या विरोधात देवी आईच्या धाडसी कार्यांचा उल्लेख देखील मिळतो. दसरा किंवा विजया दशमी नवरात्राच्या नंतर दहाव्या दिवशी साजरा करतात. या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता.
 
राम-रावणाचा युद्ध - रावणाने माता सीतेला हरून लंकेत नेले. भगवान राम हे युद्धाची देवी आई दुर्गेचे भक्त होते त्यांनी युद्धाच्या काळात पहिल्या नऊ दिवसापर्यंत आई दुर्गेची पूजा केली आणि दहाव्या दिवशी दुष्ट रावणाचा संहार केला म्हणून विजयादशमी एक महत्वाचा दिवस आहे. रामाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला 'विजयादशमी' म्हणतात.
 
दसऱ्याच्या सणावर भरते जत्रा -
दसऱ्याचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी जागोजागी मोठ्या जत्रा भरतात. याचा आनंद लुटण्यासाठी लोकं आपल्या मित्र आणि कुटुंबासह येतात आणि मोकळ्या आकाशा खाली जंत्र्यांचा पुरेपूर आनंद घेतात. या जत्रेमध्ये वेगवेगळ्या रंगीत बांगड्या, वस्तू आणि खेळणी,कपडे विकतात. याच बरोबर खाण्याच्या पदार्थांचा भांडार असतो.
 
रामलीला आणि रावण वध - या काळात बऱ्याच ठिकाणी रामलीला देखील आयोजित करतात. रावणाचा मोठा पुतळा बनवून त्याला पेटवतात. दसरा किंवा विजयादशमी भगवान रामाच्या विजयाच्या रूपात साजरा करा किंवा दुर्गा पूजेच्या रूपात, दोन्ही रूपात हा सण शक्ती-पूजा, शस्त्रपूजा, आनंदाचा आणि विजयाचा सण आहे. रामलीला मध्ये जागो-जागी रावण वध करतात.
 
शक्तीच्या प्रतीकांचा सण - शक्तीच्या उपासनेचा हा सण शारदीय नवरात्रापासून ते नवमी पर्यंत नऊ तारखा, नऊ नक्षत्र, नऊ शक्तीच्या भक्ती सह सनातन काळापासून साजरा केला जात आहे. या निमित्ताने लोकं नवरात्राच्या नऊ दिवस जगदंबेची वेग-वेगळ्या रूपांची उपासना करून सामर्थ्यवान राहण्याची इच्छा करतात. भारतीय संस्कृती नेहमीच शौर्य आणि वीरताची समर्थक आहे. दसऱ्याचा सण देखील शक्तीच्या प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा सण आहे.
 
वाईटावर चांगल्याची विजय -
या दिवशी क्षत्रियांच्या घरात शस्त्र पूजा करतात. या दिवशी रावण, मेघनाद आणि कुंभकर्णचे पुतळे पेटवतात. काही कलाकार राम,सीता आणि लक्ष्मणाचा वेष धरून येतात आणि आगीच्या बाणाने या पुतळ्यांना बाण मारतात जे फटाक्याने भरलेले असतात. पुतळ्यात आग लागतातच तो पुतळा पेटून उठतो आणि त्यामधील फटाके फुटतात आणि या मुळे त्याचा अंत होतो. हा सण वाईटावर चांगल्याची विजयाचा प्रतीक आहे.