बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. आमने-सामने
Written By अभिनय कुलकर्णी|

तीन विद्यमान आमदार आमने-सामने

यंदा गुहागरची लढत ऐतिहासिक ठरणार आहे. कारण या लढतीत तीन विद्यमान आमदार आमने-सामने उभे राहिले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच तीन आमदारांत लढत होते आहे.

या मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजपचे डॉ. विनय नातू आहेत. मात्र, विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांचा खेड मतदारसंघ पुनर्रचनेत गायब झाल्याने त्यांना गुहागर हवा होता. भाजप आणि शिवसेनेतील जागावाटप याच जागेवरून अडले होते. जनसंघापासून ही जागा भाजपकडे आहे. असे असतानाही भाजपने ही जागा शिवसेनेला देऊन टाकली. त्यानंतर डॉ. नातू यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधान परिषदेत आमदार असलेले भास्कर जाधव लढत आहेत. त्यामुळे हे तीन आमदार आमने-सामने उभे ठाकले आहेत. ही लढत नक्कीच चुरशीची होणार यात काही शंका नाही.