बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मागोवा 2011
Written By मनोज पोलादे|

प्रिंस विलियम आणि कॅथरीन मिडलटन शाही विवाहसोहळा

ND
प्रिंस विलियम आणि कॅथरीन मिडलटन यांचा शाही विवाहसोहळ्याबाबत जगभरात प्रचंड उत्सुकता होती. संपूर्ण जगभरातील दूरचित्रवाहिण्यांनी या सोहळ्याचे थेट प्रेक्षपण केले आणि घराघरातून तो तितक्याच उत्साहाने पाहण्यात आला. इंग्लंडच्या राजघराण्याबाबत इंग्लंडमध्ये प्रचंड आदर आहे. मात्र जगभरात या घराण्याबाबत आजही प्रचंड क्रेझ आहे. विवाहाच्या बारीकसारीक तयारीपासून प्रत्येक गोष्टीची जगभरातून खूप चर्चा झाली. विलियम आणि केटची भेट, दोघांमध्ये बहरलेले प्रेम, लग्नाचा निर्णय ते हनिमूनपर्यंत सर्वच गोष्टींचा प्रचंड फॉलोअप घेण्यात आला.

राजघराण्यातील विवाहसोहळ्याबाबत जगभरात इतकी उत्सुकता असण्याची कारणमीमांसा आजपर्यंत झालीच असणार आणि भविष्यातही होईल. राजेशाहीबाबत, राजघराण्याबाबत, आपल्या राज्याबाबत जनतेच्या मनात प्रेम, आस्था, आदर, सन्मानाची भावना जगभरातून आजही कायम आहे, हेच यातून सिद्ध होते.

केट ही राजघराण्यातील नसून सामान्य कुटूंबातील आहे. इंग्लंडमध्ये सामान्य घराण्यातील मुलगी राजघराण्याची सून होऊ शकते, यात स्वातंत्र्य, समता, बंधूतेसोबत लोकशाहीचा विजय आहे. आपली सर्वात मोठी लोकशाही असूनसुद्धा आपल्याकडे तितकी सामाजिक समता अजून रूजलेली नाही.

फोटो गॅलरीसाटी येथे क्लिक करा....

केट ही स्वतंत्र व्यक्तिमत्वाची आधुनिक स्त्री असून विलियमलाही त्याचा नितांत आदर आहे. विलियम व केट यांची भेट सेंट अँड्र्यू विश्वविद्यालय, स्कॉटलँड येथे शिक्षण घेत असताना झाली. दिवसेंदिवस नाते वृद्धींगत होऊन प्रेमाचा अंकुर फुलला. प्रेम बहरले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. २००१ मध्ये पहिल्या भेटीपासून तब्बल १० वर्षांनी नात्याचे रूपांतर विवाहात झाले. ब्रिटीश राजघराण्यासाठी गेल्या ३० वर्षातील एक आनंददायक क्षण होता. वेस्टमिन्सटर कॅथेड्रल येथे हा शाही विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला. राजपुत्र विलियम्स आणि केट किंवा कॅथरीन मिडलटनची प्रेमकहाणी एक 'फेअरीटेलच' आहे. विविध वळणं घेतल्यानंतर अखेर हे नाते स्थिरावले आणि या 'फेअरीटेलचा' २९ एप्रिल २०११ मध्ये सुखांत झाला.