Ashadhi Ekadashi Recipes उपवासाच्या काही रेसिपी

fast recipe
Last Updated: शनिवार, 9 जुलै 2022 (13:39 IST)
साबुदाणा खिचडी
साहित्य :-
१)दोन वाट्या साबुदाणा
२)एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
३)सहा-सात हिरव्या मिरच्या
४)चवीला मीठ , साखर , पाव वाटी तूप
५)एक चमचा जिरं , एक चमचा लिंबाचा रस.

कृती :-
१) साबुदाणा आठ-दहा तास भिजवावा .
साबुदाणा धुतल्यानंतर थोडं वरती दिसेल इतकं पाणी ठेवावं म्हणजे साबुदाणा चांगला भिजतो .
२) तुपाची फोडणी करून मिरच्यांचे तुकडे घालून परतावे .
३) साबुदाण्यात मीठ , साखर , शेंगदाण्याचा कूट , लिंबाचा रस आणि फोडणी घालून कालवावं .
४) हे मिश्रण दोन-तीन दिवसच ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजरमध्ये ठेवावं .
५) फ्रीजमधील मिश्रण काढून कुकरमध्ये एका ताटलीवर पसरून दोन-तीन मिनिटं वाफ दिली , की खिचडी तयार होते .
६) मायक्रोवेव्ह असेल तर दोन वाट्या मिश्रण झाकण ठेवून तीन-चार मिनिटं मायक्रो केलं तर मऊ मोकळी खिचडी तयार . ( दीड वाटी मिश्रणाची दोन प्लेट खिचडी होते . )
७) मिश्रण फ्रीजमधून काढल्यास ते घरातल्या तापमानाला आलं की एक वाफ द्यायची .
मायक्रोवेव्हमध्ये पहिल्यांदा डीफ्रास्त करायचं आणि मग झकण ठेवून वाफ द्यायची.

******

साबुदाणा वडा

साहित्य :-
१) २ १/२ वाट्या साबुदाणा
२) १ १/४ वाटी दाण्याचे कूट
३) ५-६ मध्यम आकाराचे बटाटे
४) तिखट
५) मीठ
६) जीरे.

कृती :-
१) साबुदाणा २ तास अगोदर धुवून ठेवावा.
२) बटाटे उकडून साले काढून घ्यावीत.
३) ताटलीत वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत आणि चांगले मळून घ्यावेत.
४) मळून झाल्यावर छोटे छोटे वडे करुन लालसर तळून घ्यावेत.
५) हे गरमागरम वडे कोथिंबीरच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.

********

उपवासाचे घावन

साहित्य :-
१) १ वाटी वरी तांदूळ
२) १ वाटी साबुदाणे
३) २ हिरव्या मिरच्या
४) २ चमचे नारळाचा चव
५) २ चमचे दाण्याचे कूट
६) १ चमचा जिरे
७) चवीपुरते मिठ
८) साजूक तूप.

कृती :-
१) साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे.
२) दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे.
३) नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू निट होवू द्यावी.
गरम गरम घावन नारळाच्या चटणी सर्व्ह करावे.

*****

रताळी आणि व-याच्या तांदळाचे पिठ चकल्या

साहित्य :-
रताळी
वरयाचे तांदूळ
हिरव्या मिरच्या
आले
मीठ

कृती :-
रताळी उकडून, सोलून, किसून घ्या.नंतर त्यात वर्‍याच्या तांदळाचे पीठ हिरव्या मिरच्या थोडे वाटलेले आले व मीठ घालून पीठ तयार करा. नंतर ह्या पिठाच्या चकल्या करून गरमा-गरम खायला द्या.

******

वऱ्याचे तांदूळ व दाण्याची आमटी

* वऱ्याचे तांदूळ व दाण्याचीआमटी :-
( सर्व सामग्री रेखांकित केली आहे. )
* तांदुळासाठी :-
१. एक वाटी
वऱ्याचे तांदूळ धुऊन घ्यावेत व त्यात ४ वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर उकळायला ठेवावेत.
२. पाणी उकळून तांदुळापर्यंत आल्यावर गॅस बारीक करावा व झाकण ठेऊन पूर्ण पाणी अटेपर्यंत शिजवावे.

* आमटी साठी :-
१.)
एक वाटी दाण्याचे कूट घेऊन त्यात लागेल तसे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी.
२.) त्यात ३ वाट्या पाणी घालून थोड्यावेळ बाजूला ठेवावे.
३.) एका पातेल्यात २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून जिरे घालावेत. जिरे चुरचुरल्यावर त्यात ३/४ वाटी पाणी घालावे.
४.) त्यातच ४-५ वाळलेली आमसुले घालून उकळी आणावी व ३-४ मिनिटे उकळू द्यावे.
५.) आता वर तयार केलेली दाण्याच्या कुटाची पेस्ट त्यात घालावी व गॅस बारीक करावा.
६.) चवीप्रमाणे मीठ व तिखट घालावे व मधे मधे हलवत आमटीला उकळी आणावी.

* वाढण्यासाठी :-

गरम गरम वऱ्याचे तांदूळ दाण्याच्या आमटी बरोबर वाढावेत. सोबत उपासाचे गोड लोणचे, बटाट्याचे किंव्हा साबूदाण्याचे पापड, व बटाट्याची उपासाची भाजी ही वाढावी.
******


केळीचा रायता

साहित्य :-
1.पिकलेली केळी:३
2.वाळलेले बारीक खोबरे:१/२ कप
3.लिंबू:१
4.वेनिला किंवा साधे दही:१ कप
5.बारीक कापलेले बदाम:१ टेबल स्पून.

कृती :-
-वाळलेले बारीक खोबरे कोरडे च तांबुस होईपर्यंत भाजा.
-केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा.त्या कापांना लिंबाचा रस चांगला लावा म्हणजे केळी काळी पडणार नाहीत.
-त्या कापांमधे दही,खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा.झाला तुमचा रायता तयार.
-तुम्ही हा रायता गार करून किंवा तसाच खाऊ शकता.तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर घालू शकता.
-हा रायता तुम्ही साइड डिश म्हणून किंवा स्नॅक म्हणून तसेच खाऊ शकता.

***

उपवासाचा बटाटा वडा

सारणासाठी साहित्य :-
1. 1 किलो उकडलेले बटाटे
2. 1 कच्चा बटाटा किंवा १ रताळे किसलेले
3.
आले
4. हिरव्या मिरच्या(उपवासाला चालत असल्यास)
5. बारीक कापलेली कोथिंबीर
6. चवीप्रमाणे मीठ
7. साखर
8. एक चमचा लिंबू रस
9. दाण्याचा कुट
10. खवलेला ओला नारळ.

कव्हरसाठीचे साहित्य :-
1. राजगिरा पीठ
2. शिंगाडा पीठ
3. साबूदाणा पीठ (नसले तरी चालेल).

कृती :-
- प्रथम हिरव्या मिरच्या, आले व थोडेसे जीरे घालून वाटून घ्या. बटाटे गरम असतानाच सोलून घ्या व बारीक करा.
- नंतर ते गार झाल्यावरच त्यात चवीप्रमाणे आल्यासह मिरचीचा ठेचा, दाण्याचा कुट, खोवलेला ओला नारळ घाला.
- नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व एक चमचा साखर घाला वर लिंबाचा रस टाका व सर्व मिश्रण हाताने एकजीव करा.
- एकजीव झालेल्या सारणाचे तळहाताला थोडे पाणी लावून चपटे वडे थापून घ्या. सर्व पीठे एकत्र करुन त्यात पाणी घालून सरबरीत करा.
- त्यात थोडेसे मीठ, तिखट व किसलेला बटाटा किंवा रताळे घाला. कढईत तेल घालून तापवा.
- तेल गरम होताच त्यातून एक चमचा तेल काढून सरबरीत केलेल्या पिठात टाका.
- नंतर तापलेल्या तेलात चिमुटभर मीठ टाका म्हणजे वडे तेलकट होत नाहीत. वडे पिठात घोळवून तळून काढा व गरमागरम वडे खोबर्‍याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

***

रताळ्याची कचोरी

सारण :-
1. १ मूठ चिरलेली कोथिंबीर
2. १ वाटी खवलेले खोबरे
3. ४-५ हिरव्या मिरच्या
4. ५० ग्रॅम बेदाणा
5. मीठ
6. साखर.

कव्हरसाठीचे साहित्य :-
1.
२५० ग्रॅम रताळी
2. १ मोठा बटाटा
3. थोडेसे मीठ.

कृती :-
- रताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून, हाताने कुस्करून बारीक करावे.
- त्यात थोडे मीठ घालावे. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात इतर सर्व वस्तू घालुन सारण करावे.
- रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्‍या ठेवाव्यात. नंतर आयत्या वेळी वर्‍याच्या तांदळाच्या
- पिठात घोळवून तुपात तळाव्यात.
- गरमगरम खायला द्याव्या. फार सुंदर लागतात. उपवासाला एकदम चांगल्या.

**

खजूर मिल्क शेक

साहित्य :-
1.२ कप दूध, १२ खजूर, ३ ते ४ काजू, २ हिरवी वेलची,
2. तुम्हाला थंड चालत असल्यास १ कप बर्फाचे तुकडे.

कृती :-
- खजूर चांगला साफ करून त्याचे बारीक तुकडे करा.
- काजूचे बारीक तुकडे करून, हिरव्या वेलचीच्या दाण्यांची पुड करून घ्या.
- मिक्सरमध्ये खजुराचे बारीक केलेले तुकडे आणि थोडे दूध घालून चांगले फिरवून घ्या.
- आता त्यात वेलची पावडर आणि उरलेले दूध घालून पुन्हा मिक्समधून फिरवा.
- शेवटी बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्समधून फिरवून घ्या.
- तयार झालेले खजूराचे मिल्क शेक एका ग्लासात ओतून काजूच्या तुकड्यांनी गार्निश करून सर्वकरा .

****

रताळा स्वीट

साहित्य
1.
अर्धा किलो रताळी
2. साखर एक वाटी
3. ओला नारळ चव दीड वाटी
4. चार/पाच वेलदोडे
5.
तूप.

कृती :-
-
रताळ्याच्या साली काढा.
-
त्याचे पातळसर गोल काप करा नंतर काप धुवा. बाजूला ठेवा.
- मंदाग्नीवर जाड बुडाच्या पातेल्यात थोडे तूप गरम करा. त्यात रताळे काप घाला.
- झाकण ठेवून शिजत ठेवा.झाकणावर थोडे पाणी ओतून ठेवा म्हणजे आत रताळी मऊसर शिजतात.
- रताळी शिजली की त्यावर नारळ चव,साखर आणि वेलची पूड टाका.
-
थोडा वेळ मंदाग्नीवर शिजवा. थोड्या वेळाने भांडे उतरवून ठेवा.
- हे रताळा स्वीट सर्वांनाच आवडतात.
आजीचा बटवा सखी फॅशन रसोई ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी msg करा 774585oo79

****

बटाटा पूरी

साहित्य :-
1. २ मोठे बटाटे, उकडलेले
2. १/२ कप साबुदाणा
3. ७ ते ८ मिरच्या
4. १/४ कप कोथिंबीर, चिरून
5. १/२ टिस्पून जिरे
6. ३ टेस्पून शेंगदाणा कूट
7. १ टिस्पून जिरेपूड
8. १ ते २ टेस्पून शिंगाडा पिठ (टीप)
9. चवीपुरते मिठ
10. तळण्यासाठी तेल.

कृती :-
-
१/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे.
- साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे.
- मिक्सरमध्ये ७-८ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मिठ घालून बारीक करावे. पाणी घालू नये.
- जर मिक्सर नसेल तर मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
- शिजवलेले बटाटे किसून घ्यावे. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवावा. चव पाहुन, लागल्यास मिठ घालावे.
-
मध्यम दिड इंचाचे गोळे करावे. तेल तापत ठेवावे. तेल तापले कि आच मिडीयम हायवर ठेवावी. एक प्लास्टिकचा जाड तुकडा घ्यावा. त्याला तेलाचा हात लावावा. प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापावा आणि मध्यभागी बोटाने भोक पाडावे. पातळ थापू नये, नाहीतर तेलात टाकल्यावर पुरी तुटते आणि विरघळते.
-
पुरी तेलात टाकल्यावर ती झार्‍याने अजिबात पलटू नये. पुरी पलटली ती हमखास तुटते. त्यावेळी झार्‍याने अलगद तेलात बुडवावी म्हणजे वरच्या बाजूलाही छान ब्राऊन रंग येईल. तळलेल्या पुर्‍या चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.

*****

दाण्याची आमटी

साहित्य :-
1. 1 1/2 कप दाण्याचा कुट
2. ३ कप पाणी
3. मीठ चवीप्रमाणे
4. २ टीस्पून साखर
5. २-३ आमसुलं

6. १/२ टीस्पून जिरे
7. २ हिरव्या मिरच्या
8. २ टेबलस्पून कोथिंबीर
9. ३ टेबलस्पून ओलं खोबरं
10. २ टेबलस्पून तूप.

कृती :-
-
दाण्याचा कुट पाण्यात मिक्स करा. त्यात मीठ, साखर, आमसुलं,
ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून उकळुन घ्या.
- फोडणीच्या कढईत तूप गरम करा. तूप कडकडीत तापले कि मिरची घाला.मिरची पांढरी झाली. कि जिरे घालून आमटीला फोडणी द्या.
-
दाण्याची आमटी व-याच्या
तांदुळा बरोबर सर्व्ह करा.

***

अ‍ॅपल रबडी

साहित्य :-
1.

गोड जातीची सफरचंदे, लहान असतील तर दोन आणि मोठे असेल तर १.
2.
लिंबाचा रस ४/५ थेंब किंवा चिमूटभर सायट्रीक अ‍ॅसिड
3.
आवडत असेल तर चिमूटभर दालचिनी पावडर ( किंवा आवडता स्वाद )
4.१ टिस्पून बारीक केलेले अगर अगर
5.
एक कपभरून मिल्क पावडर
6.१ टिस्पून साखर
7. १ टिस्पून साजूक तूप.

कृती :-
-
एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस
किंवा सायट्रीक अ‍ॅसिड आणि दालचिनी पूड एकत्र करा.
-
सफरचंदाचा मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा.
- मग ते वरील पाण्यातच किसा.
- आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल. पिठूळ असतील तर लगेच शिजतील. शिजवून जॅम करायचा नाही. सगळे मिश्रण छान एकजीव झाले आणि पाणी आटले कि आच बंद करा. सफरचंदाच्या गोडीवर अवलंबून साखर वापरायची आहे कि नाही ते ठरवा.
- साखर या मिश्रणातच घालून शिजवा.
- एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत १ टिस्पून साखर टाका आणि मंद आचेवर ठेवा. थोड्याच वेळात साखर वितळेल आणि ती सोनेरी रंगावर जाईल. आणखी थोड्याच वेळात काही भागात तपकिरी होऊ लागेल.
- तसे होऊ लाहले कि त्यात अर्धा कप पाणी टाका.
-
त्यात साजूक तूप टाका. पाण्याला छान उकळी आली कि त्यात मिल्क पावडर टाका आणि डावेने भराभर ढवळा. पाणी गरम असल्याने मिल्क पावडर चटकन मिसळने आणि मिश्रणाला आटीव दूधाचा रंग आणि स्वादही येतो.
- आच बंद करून त्यात सफरचंदाचे मिश्रण टाका आणि गरज वाटली तर हँड मिक्सरने ब्लेंड करा. आणि चमच्या चमच्याने आस्वाद घ्या.

****

उपवासाचे अनारसे

साहित्य :-
1. जरुरीप्रमाणे वरई तांदूळ
2. साखर किंवा गूळ
3. खसखस
4. तूप.

कृती :-
- वरई तांदूळ तीन दिवस भिजत ठेवावेत. मग उपसून स्वच्छ कपड्यावर अर्धवट वाळवावे. - नंतर खलबत्त्यात चांगले बारीक कुटून घ्यावेत. यात जेवढे पीठ त्याच्या निमपट साखर किंवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घ्यावे. झाकून ठेवावे.
- नंतर दुसरे दिवशी नेहमी अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. त्यावर खसखस लावावी.
- लालासर रंगावर तळून घ्यावेत. सुंदर दिसतात. आणि लागतातही चविष्ट.

****

दाण्याची चिक्की

साहित्य :-
1. दाणेकूट एक वाटी
2. साखर एक वाटी
3. तूप दोन चमचे
4. चिमुटभर मीठ

कृती :-
- मंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घाला. परता. नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही
- याची दक्षता घा. पाणी घालायचे नसते. साखर विरघळू लागेल त्यावेळी एक चमचा तूप घाला. - दाणेकूट घाला.
- ढवळून घ्या. पोळपाटाला तुपाचा हलका हात लावून घ्या. दाण्याचे मिश्रण पोळपाटावर घाला. - लाटण्याचे मिश्रण पोळपाटावर सम पातळीवर लाटून घ्या. लगेच त्याच्या वड्या करा.

****

बटाट्याचा कीस

साहित्य :-
१) चार मोठे बटाटे,
२) दाण्याचे कूट,
३) चवीपुरते मीठ,
४) चिमुटभर साखर,
५) तूप एक मोठा चमचा,
६) जिरे फोडणीपुरते,
७) तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे,
८) बारीक चिरलेली कोथिंबीर,
९) खवणलेला ओला नारळ

कृती :-
१) सर्वप्रथम बटाटे किसून घ्यावेत. त्यानंतर एक पातेली गॅसवर गरम करत ठेवावी.
२) पातेली थोडी गरम झाल्यावर त्यात तूप घालावे. तूप गरम झाल्यावर जिरे घालावे.
३) आता हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरच्याचा रंग पांढरा झाल्यावर त्यावर बटाट्याचा कीस घालावा.
४) आता झाकण टाकून बटाट्याचा कीस शिजवावा. मग झाकण काढून त्यात मीठ, साखर, दाण्याचे कूट घालावे. व परत एक वाफ काढावी. गॅस बंद करावा. बटाट्याचा कीस तयार आहे.
५) आता ओला नारळ व कोथिंबीर

घालून गरम गरमच खायला द्यावा.

****

फोडणीचे भगर

साहित्य :-
१) वरीचे तांदूळ एक वाटी,
२) हिरव्या मिरचीचे तुकडे,
३) जिरे,
४) मीठ,
५) साखर,
६) पाणी,
७) दाण्याचे कूट.

कृती :-
१) वरीच्या तांदुळाप्रमाणे तांदूळ धुवून परतून घ्यावेत. त्यानंतर एका पातेलीत तूप गरम करत ठेवावे.
२) त्यातच जिरे आणि मिरचीचे तुकडे घालावेत. त्यावर वरीचे तांदूळ घालून परत एकदा परतून घ्यावे.
३) आणि साधारण दुप्पट उकळते पाणी घालून फोडणीचे भगर शिजवून घ्यावे.
४) भगर शिजल्यानंतर त्यात दाण्याचे कूट घालावे. तूप सोडावे. म्हणजे भात मोकळा होईल.
५) गरम गरम फोडणीचे भगर खायला द्यावे.

****

उपवासाची बटाट्याची भाजी

साहित्य :-
१) ३-४ मध्यम आकाराचे बटाटे
२) ३ टेबलस्पून दाण्याचा कुट
३) २ टेबलस्पून ओलं खोबरं
४) १
टीस्पून जिरे
५) २-३ हिरव्या मिरच्या
६) १ टीस्पून साखर
७) १ टेबलस्पून कोथिंबीर
८) २ टेबलस्पून तूप
९) मीठ चवीप्रमाणे

कृती :-
१) बटाटे कुकरमध्ये उकडून त्याची साले काढा आणि बारीक फोडी करा.साधारण १/२" x १/२" च्या चौकोनी फोडी करा.
२) बटाट्याच्या फोडींना मीठ साखर दाण्याचा कुट चोळून ठेवा.
३) कढईत
तूप कडकडीत गरम करा आणि जिरे आणि हिरवी मिरची फोडणीला घाला.
लगेच बटाट्याच्या फोडी घालून परता.
४) ओलं खोबरं कोथिंबीर घालून १ वाफ आणा आणि सर्व्ह करा.


*****
साभार-आजीचा बटवा रसोई सखी फॅशन ग्रुप
रेसिपी संग्राहक- असोदेकर काका 7745850079


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Relationship Tips: पत्नीला राग आल्यावर तिला शांत करण्यासाठी ...

Relationship Tips: पत्नीला राग आल्यावर तिला शांत करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
Cool Down Tips: पती-पत्नीचे नाते हे मित्रासारखे असते. खूप प्रेम, समजून आणि काळजी घेऊन ...

Career in Graphic Designing: ग्राफिक डिझायनिंग मध्ये ...

Career in Graphic Designing:  ग्राफिक डिझायनिंग मध्ये करिअरची संधी, पात्रता, संपूर्ण माहिती जाणून घ्या
Career In Graphic Design : ग्राफिक डिझायनिंग हा नवीन युगातील अभ्यासक्रमांच्या यादीत येतो ...

DRDO Apprentice Recruitment 2022: ITI उत्तीर्णसाठी DRDO ...

DRDO Apprentice Recruitment 2022:  ITI उत्तीर्णसाठी DRDO मध्ये  उत्तम संधी , पात्रता, पदांचा तपशील, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
DRDO Apprentice Recruitment 2022: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने ...

Yoga For Glowing Skin ग्लोइंग त्वचेसाठी हे 5 सर्वोत्तम ...

Yoga For Glowing Skin ग्लोइंग त्वचेसाठी हे 5 सर्वोत्तम योगासन
योग केवळ तुमचे मन अधिक सक्रिय आणि मोकळे बनवत नाही, तर ते तुम्हाला चांगले, टोन्ड शरीर ...

Deep Sleep : रात्री गाढ झोप येण्यासाठी करा हे 5 उपाय, सकाळी ...

Deep Sleep : रात्री गाढ झोप येण्यासाठी करा हे 5 उपाय, सकाळी मूड फ्रेश होईल
आजकाल झोप न येण्याची समस्या सामान्य झाली आहे. आजच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या ...