कमी तेलात बनवा कुरकुरीत उपवासाचे कटलेट; नवरात्रीत संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय
कमी तेलात आणि सोप्या पद्धतीने बनवा कुरकुरीत उपवासाचे साबुदाणा-बटाटा कटलेट जे नवरात्रीत संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे. तर चला जाणून घ्या रेसिपी....
साहित्य-
भिजवलेला साबुदाणा: १ कप
उकडलेले बटाटे: २ ते ३ (मॅश केलेले)
भाजलेल्या दाण्यांचे कूट: ३ ते ४ चमचे
हिरवी मिरची: २ ते ३ (बारीक चिरलेली किंवा वाटलेली)
जिरे: १ छोटा चमचा
शिंगाड्याचे किंवा राजगिरा पीठ: २ चमचे (बाइंडिंगसाठी)
सेंधव मीठ (किंवा साधे मीठ): चवीनुसार
चिरलेली कोथिंबीर: आवडीनुसार (उपवासाला चालत असल्यास)
तेल किंवा तूप
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये भिजवलेला साबुदाणा, उकडलेले बटाटे, दाण्यांचे कूट, हिरवी मिरची, जिरे, मीठ आणि शिंगाड्याचे/राजगिऱ्याचे पीठ एकत्र करून चांगला गोळा मळून घ्या. हाताला थोडे तेल/तूप लावून मिश्रणाचे लहान-लहान गोल किंवा टिक्कीच्या (कटलेट) आकारात गोळे बनवून घ्या.
आता नॉन-स्टिक तव्यावर फक्त १ ते २ चमचे तेल किंवा तूप पसरवून गरम करा. त्यावर कटलेट ठेवा आणि मंद ते मध्यम आचेवर एका बाजूने ३-४ मिनिटे छान सोनेरी होईपर्यंत भाजा. त्यानंतर कटलेट उलटून दुसऱ्या बाजूनेही थोडे तेल सोडून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. किंवा अप्पे पात्राच्या प्रत्येक खाचामध्ये २-३ थेंब तेल टाका. तयार मिश्रणाचे लहान गोल अप्पे पात्रात ठेवा आणि झाकण ठेवून २-३ मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्या. बाजू उलटून दुसऱ्या बाजूनेही कुरकुरीत होईपर्यंत शेकवून घ्या. गरमागरम, कुरकुरीत कटलेट उपवासाच्या घट्ट दह्यासोबत किंवा ओल्या नारळाच्या हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.