suvichar
✕

नवरात्रीच्या उपवासासाठी राजगिरा लाडू घरीच कसे बनवायचे? पाक न करता सोपी पद्धत

Updated: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2026 (17:59 IST)
 
साहित्य-
भाजलेले राजगिरा लाह्या: २ कप (बाजारात सहज मिळतात)
बारीक किसलेला किंवा चिरलेला गूळ: १ कप
साजूक तूप: २ टेबलस्पून
वेलची पूड: १/२ टीस्पून
काजू-बदामाचे तुकडे: २ टेबलस्पून (ऐच्छिक)
ALSO READ: नवरात्रीत देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवा घरगुती पेढे; मोजक्या साहित्यात सोपी रेसिपी
कृती- 
गूळ आणि तूप वितळवणे: पाक बनवायचा नाही, फक्त गूळ वितळवायचा आहे. एका कढईत २ टेबलस्पून साजूक तूप गरम करा. त्यात १ कप बारीक चिरलेला गूळ घाला. मंद आचेवर गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत १ ते २ मिनिटे ढवळत राहा. गुळाचा कडक पाक करायचा नाही; गूळ वितळून त्याला हलका फेस आला की लगेच गॅस बंद करा.
 
मिश्रण एकत्र करणे:गॅस बंद केल्यावर लगेच वितळलेल्या गुळात वेलची पूड, काजू-बदामाचे तुकडे आणि २ कप राजगिरा लाह्या घाला. सर्व चमच्याने पटकन एकत्र छान मिक्स करून घ्या.
ALSO READ: साबुदाणा वडा कुरकुरीत होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
गरम असतानाच लाडू वळणे:मिश्रण थंड झाल्यास लाडू वळले जाणार नाहीत.मिश्रण थोडे कोमट असतानाच (हात सोसेल एवढे) हाताला हलके तूप किंवा पाण्याचा हात लावा आणि लहान-लहान आकाराचे गोल लाडू वळून घ्या. जर राजगिरा लाह्या थोड्या मऊ वाटत असतील, तर कढईत १ मिनिट मंद आचेवर कोरड्याच परतून घ्या; यामुळे लाडू छान कुरकुरीत होतात.हे लाडू हवाबंद डब्यात ठेवल्यास १५ ते २० दिवस सहज टिकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: कमी तेलात बनवा कुरकुरीत उपवासाचे कटलेट; नवरात्रीत संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

ही रोपे आता लावा, हिवाळ्यात तुमची बाग रंगीबेरंगी फुलांनी बहरून जाईल

प्रेरणादायी कथा : विश्वास आणि विश्वासघात; गोष्ट ससा आणि चार मित्रांची

नव्या पिढीने वाचायलाच हव्यात अशी १० मराठी पुस्तके

घरीच कुरकुरीत आणि मसालेदार ''नाचणीचे चिप्स'' बनवा, चव अशी की प्रत्येकजण रेसिपी विचारेल

४० नंतर Periods मध्ये बदल का होतात? दुर्लक्ष न करण्याची ७ लक्षणे

पुढील लेख
Show comments