सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (20:45 IST)

Navratri Falahari Recipe: नवरात्रीच्या उपवासात बनवा मखाण्याचे पौष्टीक लाडू, जाणून घ्या रेसिपी

Paneer coconut laddu
Makhana Poushtik Ladoo : नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात अनेक वेळा ऊर्जेची कमतरता जाणवते. कारण उपवासाच्या या नऊ दिवसांत फक्त फळं खाल्ली जातात. ज्यामध्ये गव्हाचे पीठ, चेस्टनटचे पीठ, बटाटे आणि साबुदाणा इत्यादींचा वापर केला जातो. जे बनवायला वेळ लागतो. उपवासाच्या दिवसात मखाण्यापासून तयार केलेले. ड्रायफ्रुट्स आणि मखाण्या पासून बनवलेले हे लाडू नवरात्रीच्या उपवासात ऊर्जा देतात. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य-
शंभर ग्रॅम मखाणे, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम, नारळ किंवा सुके खोबरे, चार चमचे साजूक तूप, पिस्ता, दोन चमचे बारीक चिरलेले, बेदाणे, 200 ग्रॅम गूळ, अर्धी वाटी पाणी, वेलची पूड.
 
कृती -
लाडू तयार करण्यासाठी सर्व प्रथम  मखाणे परतण्यासाठी गॅसवर तवा गरम करून त्यात एक चमचा साजूक तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात मखाणे परतून घ्या. गॅस बंद करून मखाणे  एका प्लेटमध्ये काढून घ्या. थोडं थंड होऊन कुरकुरीत झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पूड करून घ्या.
 
तवा पुन्हा गरम करून त्यात काजू आणि बदाम कोरडे भाजून घ्या. गॅस बंद करा आणि कोरड्या खोबऱ्याची पावडर परतून घ्या. या सर्व गोष्टी एका प्लेटमध्ये काढून थंड करा. आता या सर्व गोष्टी मिक्सरच्या भांड्यात टाका आणि बारीक वाटून घ्या.हवे असल्यास तुम्ही उरलेले ड्राय फ्रूट्सही कोरडे परतून घेऊ शकता. मखाणे पूड आणि वाटलेले  ड्रायफ्रूट्स एकत्र करा वेलची पावडर आणि बेदाणे मिसळा.
 
आता गॅसवर तवा गरम करून त्यात गूळ घाला. पाणी घालून ते वितळवा. गूळ वितळून उकळायला लागल्यावर गॅस थोडा कमी करा. आता एक तारेची चाशनी होईपर्यंत उकळत रहा.  मखाण्याचे सर्व साहित्य या चाशनी मध्ये टाकून गॅस बंद करा. नंतर थंड  झाल्यावर लाडू तयार करा. आता हे लाडू दोन आठवडे हवाबंद डब्यात ठेवा. संपूर्ण नवरात्रीच्या उपवासात हे लाडू आरामात खाऊ शकता. यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल.