शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई आर्टीकल
Written By
Last Modified: गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (13:57 IST)

फेंगशुई : या उपायांद्वारे तुम्ही मिळवा चांगले आरोग्य

स्वस्थ शरीराला सर्वात मोठा खजिना मानन्यात आला आहे. घरात जर कोणी आजारी असेल किंवा आरोग्य विषयक कुठला त्रास होत असेल तर याचे मुख्य कारण घरात उपस्थित नाकारात्मक ऊर्जा देखील असू शकते. फेंगशुईत उत्तम आरोग्यबद्दल बरेच काही सांगण्यात आले आहे. खाली दिलेले उपाय केले तर तुम्ही देखील उत्तम आरोग्य मिळवू शकता.  
 
जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम नसेल तर त्याला नेहमी उत्तर दिशेकडे डोक ठेवून झोपायला पाहिजे. पोटाच्या रोगाने त्रस्त असेल तर झोपताना उशी घेऊ नये. लाल आणि काळ्या रंगांच्या चादरीवर झोपणे टाळावे, हे रंग आरोग्यास हानी पोहोचवतात.  
 
जर नेमही डोकेदुखीचा त्रास होत असेल तर बेडरूममध्ये ज्या दिशेत आरसा लावला असेल त्या बाजूस झोपू नये. बीमच्या खाली झोपणे देखील टाळायला पाहिजे. बीमच्या खाली झोपण्याने देखील डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
 
ज्या खोलीच्या वर टॉयलेट किंवा बाथरूम असेल तर त्या खोलीत देखील नाही झोपायला पाहिजे. घरातील ज्या खोलीचे दार जिन्याकडे उघडतात, त्या खोलीत देखील झोपणे टाळायला पाहिजे. फेंगशुईत असे मानले जाते की त्या खोलीत नाकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो. 
 
फेंगशुईनुसार घराची रक्षा ड्रैगन करतो. म्हणून घरात ड्रैगनची मूर्ती किंवा चित्र ठेवायला पाहिजे. घरातील पूर्वेकडील भागाला जास्त महत्व दिले पाहिजे. पूर्व दिशेला उत्तम आरोग्य आणि दिर्घायू होण्याचे कारक मानले जाते. 
 
घरात प्रवेश करताना चपला, जोडे बाहेर काढायला पाहिजे. फेंगशुईत बोनसाई आणि कॅक्टसला हानिकारक मानले जाते. चुकूनही यांना घरात नाही ठेवायला पाहिजे. फेंगशुईत कासवाला शुभ मानले जाते. याला घरात ठेवल्याने घरात आनंद येतो.