सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Updated : मंगळवार, 5 जून 2018 (17:05 IST)

ही अप्सरा बनली फिफा विश्वचषकाची अॅम्बेसेडर

रशियात पहिल्यांदाच फिफा विश्वचषक रंगणार असून या सोहळ्यासाठी एका मॉडेलची अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या संमतीनेया मॉडेलची निवड करण्यात आली आहे.
 
फिफा वर्ल्डकप २०१८ साठी अॅम्बेसेडरपदी नियुक्त करण्यात आलेल्या मॉडेलच्या सौदर्याने सर्वांना घायळ केले आहे. व्हिक्टोरिया लोपेरेवा असे या आरसपानी सौदर्य लाभलेल्या मॉडेलचे नाव आहे. व्हि क्टोरिया ही एक टेलिव्हीजन अँकर, अभिनेत्री आणि एक उत्तर ब्लॉगरही आहे. २००३ मध्ये व्हिक्टोरियाने मिस रशियावर मोहोर उमटवली होती. १८ मार्च रोजी पुतीन यांची दुसऱ्यांदा रशियाच्या राष्ट्रपती निवड झाली. या निवडणुकीमध्ये व्हिक्टोरियाने आपल्या १८ लाख इन्स्टाग्राम फॉलोअर्सला मतदान करण्याचे आवाहन केले होते. तसेच मॉस्कोमधील मुख्य निवडणुक अधिकारी मुख्यालयाचाही तिने दौरा केला होता.