सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: येकटेरीनबर्ग , शुक्रवार, 15 जून 2018 (11:09 IST)

इजिप्तच्या पहिलच्या सामन्यात सलाह उरुग्वेविरूध्द खेळणार

इजिप्तचा आघाडी फळीतील खेळाडू मोहम्मद सलाह खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून शुक्रवारच्या उरुग्वेविरुध्दच्या पहिल्या सामन्यात तो खेळण्याची 100 टक्के शक्यत असल्याचे प्रशिक्षक हेक्टर कूपर यांनी सांगितले.
 
या स्पर्धेत सलाह जास्तीत जास्त गोल करणारा खेळाडू ठरेल, असे भाकीत कूपर यांनी केले. लिव्हरपूलकडून खेळताना गेल्या हंगामात सलाहने 44 गोल केले आहेत. 26 मे रोजी सलाहचा खांदा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात दुखावला होता. आज शुक्रवारी सलाहचा 26 वा वाढदिवस असून त्याला तंदुरुस्तीबाबत पूर्णपणे आत्मविश्वास आहे.
 
इजिप्त संघ विश्वचषक फुटबॉलच्या अंतिम लढतीत 1990 नंतर प्रथमच परतला आहे. उरुग्वेचे आव्हान पेलणे इजिप्तसाठी निश्चितच अवघड आहे. अ गटात रशिया व सौदी अरेबिया असल्याने उरुग्वेलाही पहिल्या सामन्यात विजाचीच अपेक्षा आहे.
 
सलाह या स्पर्धेत सर्वाधिक गोल करेल का? या प्रश्नावर कूपर म्हणाले, निश्चितच सलाहमध्ये सर्वाधिक गोल करण्याची क्षमता आहे.
 
आजचे सामने
 
इजिप्त × उरुग्वे
सायंकाळी 5.30 वाजता
 
मोरक्को × इराण
रात्री 8.30 वाजता
 
पोर्तुगाल × स्पेन
रात्री 11.30 वाजता