मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. आगामी चित्रपट
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2019 (15:36 IST)

वरुण धवन आणखी एका डांस बेस चित्रपटात काम करणार

बॉलीवूड अभिनेता वरुण धवनच्या हाती आणखी एक डांसवर आधारित चित्रपट आले आहे. अमेरिकेत मुंबईच्या हिप हॉप ग्रुप किंग युनायटेडच्या मजबूत विजयावर चित्रपटाची कथा दर्शविली जाईल.
 
यापूर्वी वरूण आणि श्रद्धा कपूर अभिनीत एबीसीडी 2 ची कथा हिप हॉप ग्रुप किंग युनायटेडच्या डान्स जर्नीवर चित्रित केली गेली होती. या चित्रपटात वरुणने किंग युनायटेड ग्रुपच्या लीडर सुरेश मुकुंदची भूमिका बजावली होती. किंग युनायटेड ग्रुपने काही वेळा पूर्वीच अमेरिकन रियलिटी शो 'वर्ल्ड ऑफ डान्स' मध्ये विजेतेपद मिळविले होते. या विजयामुळे एका रात्रीत किंग युनायटेड आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप सुप्रसिद्ध झाले.
 
त्यांच्या या आकर्षक विजयात रस दर्शविताना बॉलीवूड निर्माता शैलेंद्र सिंहने या विजयामागचा कल्पनेची कथा स्क्रीनवर आणण्याचा विचार केला आहे. शैलेंद्र सिंहने किंग युनायटेड ग्रुपचे राइट्स घेतले आहे आणि त्याच बरोबर चित्रपटाच्या स्क्रिप्टवर देखील काम करण्यास सुरवात केली आहे. 
 
शैलेंद्रद्वारे निर्मित या चित्रपटात वरूण पुन्हा एकदा सुरेश मुकुंदच्या भूमिकेत दिसेल. वरूण लवकरच त्याच्या आगामी चित्रपट 'स्ट्रीट डांसर' मध्ये श्रद्धा कपूर बरोबर दिसणार आहे. किंग युनायटेड ग्रुप देखील फिल्म 'स्ट्रीट डांसर' चा भाग आहे.