1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा
Written By वेबदुनिया|

‘जंबो’- निश्चित आवडेल

IFM
एनिमेशन चित्रपट बघताना आपल्यालाही काही क्षणापुरते लहान व्हावे लागते तरच आपण अशा चित्रपटाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. त्याचबरोबरच सर्वचवयोगाटाच्या प्रेक्षकांना तीन तीस बांधू शकेल, असा चित्रपटही असावा लागतो.

परेसप्टचा ‘जंबो’ हा चित्रपट ‘हनुमान’ इतका मनोरंजक नाही. पण, एनिमेशन चित्रपटातील उत्कृष्ट म्हणून या चित्रपटाकडे निश्चितच पाहता येईल.

‘चाओ प्राया प्राह हाँगसावादी’ नामक कथेवर आधारीत ‘जंबो’ जयवीर उर्फ जंबो या हत्तीच्या पिल्लाची कथा आहे. ते आपल्या आई-वडीलांच्या शोधात आहे. या प्रवासात संदेश पाठविणा-या एका पक्षाला आणि एक हत्तीणीला भेटते. तो साथ युद्ध लढणारा हात्ती बनतो आणि शत्रूंपासून आपल्या राज्याची सुरक्षा करतो.

‘द लॉयन किंग’ या चित्रपटाशी ‘जंबो’ ची कथा मिळती-जुळती आहे. सुरूवातीस चित्रपट पकड घेत नाही पण, शत्रूशी झुंज देण्‍यासाठी राजा जंबोची निवड करतो तेव्हा प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण होते. एनिमेशनची गुणवत्ता ‘द लॉयन किंग’ या ‘फाइंडिंग नेमो’ सारखी नाही. पण, सध्याच्या एनिमेशन चित्रपटांच्या तुलनेत चांगला आहे.

‘जंबो’मध्ये हिंदी चित्रपटांचे सगळे गुण आहेत. एक गाणे आणि काही दृश्य अक्षय कुमारवर चित्रीत करण्यात आले आहेत. अक्षय, डिम्पल कपाडि़या, राजपाल यादव, गुलशन ग्रोवर यांनी यातील पात्रांना आपला आवाज दिला आहे.

एकूणच ‘जंबो’ हा सुंदर चित्रपट आहे. आणि मुलांबरोबरच मोठ्यांनाही हा चित्रपट निश्चितच आवडेल.