मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. परदेशातील संधी
Written By वेबदुनिया|

फ्रान्समधील शिक्षण

फ्रान्स प्रसिद्ध आहे ते पर्यटनासाठी आणि तेथील उच्चभ्रू संस्कृतीसाठी. फ्रान्समध्ये गेलेला माणूस फॅशनेबल झाल्याशिवाय परतणे अशक्यच मानले जाते. परंतु या ओळखी सोबतच फ्रान्स प्रसिद्ध आहे, ते येथील शिक्षणासाठीही. फ्रान्समध्ये जवळपास 1 लाख 25 हजार आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत असतात.

फ्रान्स फॅशनसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. फ्रान्सनेच फॅशन इंडस्ट्रीजचा खरा विकास केला आणि जगाला एक नवीन क्षेत्र देऊ केले. दरवर्षी सुमारे 1000 भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी फ्रान्समधील विविध संस्थांकडे अर्ज देतात. यातील अनेकांचा कल हा फॅशन शिक्षणाकडे असतो.

तसे पाहायला गेले तर फॅशन विषयातील प्राथमिक धडे घेण्यासाठी भारत अत्यंत महत्त्वाचे शिक्षण केंद्र मानले जाते, परंतु यानंतर या विषयातील उच्च शिक्षणासाठी फ्रान्सचे नाव पुढे येते.

फ्रान्समध्ये अनेक शिक्षण संस्थांमधून याचे धडे दिले जातात. फ्रान्समध्ये अनेक विद्यापीठांमध्ये फॅशन हा वेगळा विषय शिकवला जातो. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राध्यापक या विविध विद्यापीठांतून ज्ञानार्जनाचे काम करतात.

एसमोड इंटरनेशनल, पॅरिस अमेरिकन अकादमी, ईएसआईवी, आर्ट स्कूल या पॅरिसमधील संस्था फॅशन जगतात प्रसिद्ध आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर ते तीन प्रकारे अर्ज करू शकतात. यात

फ्रेंच गव्हर्नमेंट ग्रांट-
फ्रान्समधील विविध संस्थांतर्फे ही ग्रँट दिली जाते. दिल्लीतील फ्रेंच दूतावासाच्या कल्चरल, आणि सायंटिफिक विभागात आपल्याला याची अधिक माहिती मिळू शकते.

खर्च
फ्रान्समध्ये शिक्षणाचा खर्च जास्त नाही. विविध संस्थांमध्ये याचे दर कमी अधिक आहेत. टाऊन किंवा लॉजमध्ये राहण्याचा खर्च दरमहा 15 ते 30 हजारांपर्यंत पडू शकतो.

युनिव्हर्सिटी रेसिडेंस हॉलमध्ये राहणाऱ्याचा खर्च 5,500 ते 8,000 रुपए प्रती महिना लागतो. जेवण, आणि इतर खर्च धरला तर एकूण खर्च 19 ते 27 हजारांदरम्यान येऊ शकतो.

व्हिसा प्रक्रिया:
फ्रान्सचा व्हिसा काढायचा असेल तर, राजधानी दिल्ली, मुंबईतील फ्रेंच कन्सल्टंट विभागाशी संपर्क करू शकता. यासाठी आपल्याला पासपोर्ट, फ्रेंच एकेडमिक इंस्टीट्यूटचे एडमिशन सर्टिफिकेट आणि तुम्ही तिथे कुठे राहणार, व्यवस्था याची पूर्णं माहिती द्यावी लागते.

अधिक माहितीसाठी संपर्क साध
एंबेसी ऑफ फ्राँस, सेंट्रल कल्चरल, 2 औरंगजेब रोड, नवी दिल्ली -110011 फोन- 3015631, 3793892
-एजुफ्राँस-
173, बोलीवर्ड सेंट-जर्मेन, 75006, पॅरिस, फोन नं. -01 53 63 35 08, फॅक्स-01 53 63 35 49

- इंस्टीट्यूट पेरिसियन डी लँग्वेज सिविलाइजेशन ट्रांसकेस,87, बोलीवर्ड ग्रीनेला- 75015, पॅरिस,
फोन नं. - 0140560953, फॅक्स- 0143064630