शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By

गण गण गणात बोते, मंत्र जीवनाचा

kalaram mandir nasik
गण गण गणात बोते, मंत्र जीवनाचा,
ज्याने मनोमन जपला, सुकर मार्ग त्याचा,
असीम श्रद्धा ज्याने चरणी  ठेवीयली,
परब्रम्हाने च त्याची काळजी वाहिली,
चिंता न कसली त्यास, ना कोणती विवंचना,
आस त्याचीच लागली, जगणं ना त्याच्याविना,
अढळ राहो अशीच श्रद्धा, माझी ही तुझियावरी,
तारून ने रे गजानना,  भवसागर पार करी!
द्यावी सुबुद्धी सकळा, दावा मार्ग सत्कर्मा चा,
करवून घे तुझीच सेवा, दे मंत्र माणुसकीचा!
...अश्विनी थत्ते.