शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश चतुर्थी 2022
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (16:05 IST)

मुंबईतील गणपतींचे दर्शन आता एका क्लिकवर 'बाप्पा मुंबईचा' माध्यमातून

mumbai ganapati
मुंबईतील गणेशोत्सव म्हंटला तर बाप्पाचा जयघोष आणि सार्वजनिक मंडळांची ऐट पहायला मिळते. मुंबईतील या गणेश मंडळाचे दर्शन एकाच क्लिक वर आता होऊ शकणार आहे. बाप्पा मुंबईचा या संकेतस्थळाद्वारे ते शक्य होणार आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बाप्पा मुंबईचा या संकेतस्थळाचे नुकतेच मुंबईचा सम्राट, खेतवाडी सहावी गल्ली येथे अनावरण करण्यात आले.
 
मुंबईत चाळ संस्कृतीपासून ते टॉवरपर्यत प्रत्येकाच्या घराघरात आणि मंडळात बाप्पा विराजमान झालेले दिसून येतात. मुंबईतील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लागलेल्या असतात. सार्वजनिक गणेश मंडळांची वाढती प्रसिद्धी पाहता, ह्या सर्व गणपतींचे दर्शन घेण्यासाठी दहा दिवस देखील अपुरे पडतात. त्यामुळे राहून गेलेल्या तसेच घरबसल्या आपल्या आवडत्या मंडळातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बाप्पा मुंबईचा हे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे. या संकेतस्थळामार्फत मुंबईतील कोणत्याही मानाच्या गणपतीचे एका क्लिकवर लाईव्ह दर्शन घेणे आता शक्य होणार आहे.