गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश चतुर्थी 2022
Written By

Ganesh Chaturthi 2022 Wishes In Marathi गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

मोदकांचा केला प्रसाद 
केला लाल फुलांचा हार 
मखर झाले नटून तयार 
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे 
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे 
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..
सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
बाप्पाच्या उदराइतका आनंद तुमच्या आयुष्यात विशाल असो 
उंदराइतक्या लहान अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागो 
बाप्पाच्या सोंडेप्रमाणे तुम्हाला आयुष्य लांबसडक मिळो 
प्रत्येक क्षण प्रसादाच्या मोदकाप्रमाणे गोड असो 
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा
 
कोणतीही येऊ दे समस्या 
तो नाही सोडणार आमची साथ 
आहे आम्हाला सार्थ विश्वास 
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
 
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पामोरया.. मंगलमूर्ती मोरया..
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
 
श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली 
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली 
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
 
बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात
भरभरून सुखसमृद्धी येवो
हीच गणरायच्या चरणी प्रार्थना
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा
 
एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा
 
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
 
कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी 
आनंद शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातूनी
केवडा, दूर्वा, जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे
गणेश चतुर्थीचा दिवस आज खास
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रम्य ते रूप, सगुण साकार मनी दाटे भाव 
पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहीवर 
बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा 
 
सकाळ हसरी असावी 
बाप्पाची मूर्ती समोर दिसावी 
मुखी असावे बाप्पाचे नाव 
सोपे होईल सर्व काम
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा
 
मोरया मोरया मी बाळ तान्हे 
तुझीच सेवा करू काय जाणे 
अन्याय माझे कोट्यानुकोटी 
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
 
बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा 
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो
अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया
 
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फूर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया
 
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक 
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी 
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
गणपती बाप्पा मोरया!