Ganesh Chaturthi 2025 Shubh Muhurat गणेश चतुर्थीला या शुभ मुहूर्तावर गणपतीची मूर्ती स्थापित करा
दरवर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो कारण हा उत्सव भगवान गणेशाचा जन्मदिवस आहे. हा उत्सव १० दिवस चालतो, जो गणपतीच्या मूर्तीच्या स्थापनेपासून सुरू होतो. या काळात भक्त गाजत-वाजत गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन करतात आणि त्यांची विधिवत पूजा करतात. तर चला जाणून घेऊया गणपती स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता-
गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त
२७ ऑगस्ट २०२५, बुधवार
गणेश प्रतिष्ठापना आणि पूजेचा चौघडिया मुहूर्त:
अमृत: सकाळी ७:३३ ते ९:०९.
शुभ: सकाळी १०:४६ ते दुपारी १२:२२.
सायंकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त: सकाळी ०६:४८ ते ७:५५.
सर्वार्थ सिद्धि योग: सकाळी ०५:५७ ते ०६:०४.
राहु काळ: दुपारी १२:२२ ते ०१:५९.
गणेश मूर्ती विसर्जनाचा शुभ मुहूर्त:
०६ सप्टेंबर २०२५, शनिवार
अभिजित मुहूर्त: दुपारी ११:५४ ते १२:४४.
अमृत काळ: दुपारी १२:५० ते ०२:२३.
शुभ चोघडिया - सकाळी ०७:३६ ते ०९:१० पर्यंत.
चार, लाभ आणि अमृत - दुपारी १२:१९ ते संध्याकाळी ५:०२ पर्यंत.
लाभ चौघडिया - संध्याकाळी ०६:३७ ते ०८:०२ पर्यंत.
गणेश चतुर्थीला आपण चंद्र दर्शन का टाळावे?
धार्मिक श्रद्धेनुसार, गणेश चतुर्थीला चंद्र पाहून खोटे आरोप किंवा बदनामी होण्याचा धोका असतो. म्हणून, आपण या काळात चंद्र दर्शन टाळावे:
२६ ऑगस्ट २०२५: दुपारी १:५४ ते रात्री ८:२९
२७ ऑगस्ट २०२५: सकाळी ९:२८ ते रात्री ८:५७