शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

गणपती वंदन

भारतात भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची समष्टी आणि व्यष्टी रूपात वैदिक किंवा पौराणिक मंत्राने अभिषेक केला जातो. गणपती ज्ञानपिपासू लोकांसाठी साहित्याचा ‍अधिष्ठाता आहे. कुटूंबाच्या सुख-समृद्धी व वैभवाचा दाता आहे. आर्थिक व्यवहारात लोक आपल्या वहीखात्याच्या पहिल्या पानावर 'श्री गणेशाय नम:' किंवा स्वस्तिक लिहून आपल्या व्यापार वर्षाची मंगल सुरवात करतात. समाजावर त्याचा एवढा मोठा प्रभाव आहे की लोक कोणत्याही कार्याचा शुभारंभ 'वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरूमे देव शुभ कार्य सदासर्वदा' यानुसार केला जातो.

श्रुती, स्मृती, पुराण किंवा सूत्रादी ग्रंथात त्याचे अप्रतिम अलौकीक वर्णन आहे. धार्मिक ग्रंथात त्याच्या बुद्धीचे दर्शन घडते. ज्यामध्ये आपला एक दात तोडून त्याचा अग्रभाग लेखणीच्या रूपात करून महाभारत या ग्रंथाचे लेखन केले. त्याला गणपती, विनायक, लंबोदर, सुमुख, एकदंत, हेरंब, विकट, धुमकेतू, गजानन, विघ्नेश अशा अनेक नावाने ओळखले जाते. गणपती शौर्य, साहस आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे. त्याची युद्धप्रियता हेरंब नावाने प्रकट होते. विघ्नेश्वर त्याचे लोकरंजन किंवा 'परोपकाराय सताम् विभूतय' हे रूप अभिव्यक्त करतो. त्याचा महिमा भारतातच नाही तर विदेशातही पसरलेला आहे.

चीनमध्ये कुआन आणि शीतीएन, जपानमध्ये कांतिगेन शोदेन व विनाय, कंबोडियात केनेस किंवा पाईकेनिज, म्यानमारमध्ये महाविएन, ग्रीसमध्ये ओरेनश, नेपाळमध्ये हेरंब किंवा विनायक नावाने तो पूजनीय आहे. गण म्हणजे समूह वाचक असे ऋग्वेदात सांगितले आहे. ईश म्हणजे स्वामी अर्थात जो समूहाचा स्वामी होता त्याला गणेश म्हणतात. शिवपुराणानुसार गण शब्द रूद्राच्या अत्याचारासाठी वापरला जात असे.

जगदगुरू शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात गणपतीला ज्ञान आणि मोक्षाचा अधिपती सांगितले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार देव, मानव आणि राक्षस तीन गण होते. या सर्वांचा अधिष्ठाता गणपती होता.