वेदांत गणेश
- डॉ. मनस्वी श्रीविद्यालंकार
विघ्नहर्त्याचे महात्म्य स्पष्ट करणारे वैदिक वाड:मयातील काही महत्वपूर्ण मंत्र :
शुक्ल यजुर्वेदात खालील मंत्रांचा उल्लेख आहे-
'गणानां त्वा गणपति (गुं) हवामहे
प्रियानां त्वा प्रियपति (गुं) हवामहे
निधिनां त्वां निधिपति (गुं) हवामहे।'
यज्ञ, पूजा किवा कोणत्याही शुभकार्याच्या शुभारंभास ह्या मंत्राचे पठण केले जाते. ऋग्वेदातही हा मंत्र आढळतो-
'गणानां त्वा गणपति हवामवे कविं कवीनापुमश्रवस्तम्।
ज्येष्ठराजं बृह्मणां बृह्मणस्पत आ नः श्रण्वन्नतिभिः सीद सादनम्॥'
'
गणपतये स्वाहा' पासून गणपतीस आहूती अर्पित करण्याचा मंत्र कृष्ण यजुर्वेदीय कण्वसंहितेशिवाय (२४/४२) कृष्ण यजुर्वेदीय मैत्रायणीसंहिते (३/१२/१३) मध्येही आढळतो.
शुक्ल युजर्वेदातही (२२/३०) 'गणपतये स्वाहा' ने आहुति देण्याचा संदर्भ आहे. बृहत्पाराशर स्मृतित शुक्ल यजुर्वेदात (२३/१९) 'गणानां त्वा... हवामहे' या मंत्रासोबत स्वाहा वगळून हवन करण्यास सांगण्यात आले आहे. ऋग्वेदात (१०/११२/९) 'निषुसीद गणपतये.... मधवञ्चित्रमचां' ही ऋचा प्राप्त होते. यामध्ये सदकार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासंबंधी गणपीची प्रार्थना केली आहे. शुक्ल यजुर्वेदात (३३/६५-७२) 'आ तू न... ' आठ मंत्र गणपतीस अर्पित करण्यात आले आहेत. ऋग्वेदातही (८/८१/१) जवळपास सारखेच मंत्र सापडतात-
'
आ तू न इन्द्र क्षुमन्तं ग्रामं सं गृभाय।'
कृष्ण यजुर्वेदीय मैत्रायिणी संहितेत गणेशाच्या खालील गायत्रीचा उल्लेख आहे.
'
ॐ तत्कराटाय विघ्नहे हस्तिमुखाय धीमहि। तन्नो दन्ती प्रचोदयात्।'
अथर्ववेदाच्या शौनकी संहितेत वरिल मंत्र 'एक दन्ताय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि। तन्नौ दन्ती प्रचोदयात।' अशा स्वरूपात आढळतो.
शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन संहितेत (१६/२५) आणखी एक मंत्र आढळतो.
'नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमः'
कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तरीय-आरण्यकात गणेश गायत्री मंत्र खालील प्रकारे आढळतो-
तत्पुरुषाय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नौ दन्ती प्रचोदयात।'
याव्यतिरिक्त अथर्ववेदाच्या गणेशपूर्वतापन्युपनिषदात (११५) खालील मंत्र आढळतो-
'
गणानां त्वा गणनाथं सुरेन्द्र... सीदं शश्वत।'
अथर्ववेदाच्या गणेश उत्तरतापिनी उपनिषदात गणेश मंत्र भिन्न स्वरूपात आढळतो-
'
गणानां त्वा गणपतिम् । सप्रियाणां... प्रचोदयात।'
'
बृहतजाबाल उपनिषद', 'गणपति उपनिषद', 'हेरम्ब उपनिषद' यासारख्या ग्रंथामध्ये श्री गणेशाचा उल्लेख आढळतो. अतिंमत: वेदांमध्ये श्री गणेशाचा उल्लेख आढळतो, असे निर्विवादपणे म्हणता येते.