गणपती रहस्य
भारतातील देवी-देवता प्रचलित का आहेत? प्रत्येक देवी-देवताचा मंत्र, साधना, पूजा पद्धती इत्यादीमध्ये विविधता का आहे? प्रत्येक मंत्र दुसर्यापासून वेगळा का आहे? या विविधतेचे कारण काय आहे? एकमेकांमध्ये मतभेद का आहेत? या प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित होतात? वरील सर्व प्रश्नाचे उत्तर म्हणजे पूर्ण माहितीचा अभाव होय. या प्रश्नाचे उत्तर त्यामध्येच सामावलेले आहेत.
आता असा प्रश्न निर्माण होतो की या विश्वावर कुणाचा प्रभाव आहे? अर्थात ते कशापासून बनले आहे? उत्तर आहे. पंचमहाभूतांपासून. ही पाच तत्वे म्हणजे पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश होय. या पंचमहाभूतात सात्विक, तामसी आणि राजस हे तीन गुण आहेत. सात्विकतेचे (अशुद्ध सात्विक गुण प्रधान) आकाश हे तत्व आहे. रजोगुण (अशुद्ध रजोगुण प्रधान) अग्नी तत्व आहे. तमोगुण (अशुद्ध तमोगुण प्रधान) पृथ्वी तत्व आहे. रजोगुणाच्या मिश्रणाचा विपरित परिणाम म्हणजे वायू तत्व होय. रजोगुण आणि तमोगुण मिश्रणाचा विपारित परिणाम म्हणजे जल तत्व होय. अशा प्रकारे सर्व पाच तत्वे सर्व प्राणीमात्रांची शरीरे आहेत. प्रत्येक तत्वाचे कार्य वेगवेगळे आहेत.
आकाशस्याधिपो विष्णुरग्नेश्चैव महेश्वरी।
वायो: सूर्य: क्षितेरीशो जीवनस्य गणाधिप:।।
अर्थात आकाश तत्वाचा अधिष्ठाता विष्णू, अग्नीची अधिष्ठात्री देवी दुर्गा, वायुचा अधिष्ठाता सूर्य, पृथ्वीचा अधिष्ठाता शिव आणि जल तत्वाचा अधिष्ठाता गणेश आहे. लोकांना कसे माहित होईल की कोणाची उपासना फलदायक आहे? ज्या प्रकारे रोगाचे निदान करण्यासाठी डॉक्टरची आवश्यकता असते. त्या प्रमाणे योग्य गुरू साधकाचे परिक्षण करून उपासनेचा मार्ग निश्चित करा. ब्रम्हाच्या पंचमहाभूतात्मक प्रकृतीच्या प्रत्येक तत्वात ब्रह्म विराजमान आहे.