शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By वेबदुनिया|

ज्वारीच्या पीठाचे मोदक

साहित्य : पांढरी टपोरी ज्वारी, तूप, मीठ, आवडीचं सारण. 

कृती : ज्वारी निवडून धुवून कपड्यावर पसरून वाळवावी आणि अगदी बारीक दळून आणावी ते पीठ मैद्याच्या चाळणीनं चाळावं. पिठाच्या दीडपट पाणी उकळावं. त्यात थोडं तूप व मीठ घालून नेहमीप्रमाणे उकड घ्यावी.

त्यात सारण भरून मोदक करावेत आणि वाफवावेत. सोलापूर-बार्शी भागात या प्रकारचे मोदक करतात.