शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (00:43 IST)

Ganesh Chaturthi 2021 गणपती प्रतिष्ठापनेसाठी शुभ मुहूर्त

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी सर्वात मोठी गणेश चतुर्थी मानली जाते. या दिवशी लोक घरी गणपती बाप्पाची स्थापना करतात आणि भक्तिभावाने त्यांची पूजा करतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. यंदा शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशभरात गणेश पूजा केली जाईल. 
 
गणेश चतुर्थी गणपती प्रतिष्ठापनेसाठी शुभ मुहूर्त
 
भाद्रपद चतुर्थी प्रारंभ : गुरुवार, 9 सप्टेंबर 2021 रोजी 12 वाजून 17 मिनिटे
 
भाद्रपद चतुर्थी समाप्ती : शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 रोजी 9 वाजून 57 मिनिटे
 
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल.
 
गणेश चतुर्थी स्थापना शुभ मुहूर्त-
 
* रवि योग- सकाळी 6:01 ते दुपारी 12:58 पर्यंत
 
* अमृत काल - सकाळी 06:58 ते सकाळी 08:28 पर्यंत
 
* अभिजीत मुहूर्त- सकाळी 11:30 ते दुपारी 12:20 पर्यंत
 
* विजय मुहूर्त - दुपारी 01:59 ते 02:49 पर्यंत.
 
* संधिप्रकाश मुहूर्त- संध्याकाळ 05:55 ते 06:19 मिनिटांपर्यंत 
 
मध्यान्ह गणेश पूजा मुहूर्त - सकाळी 11:03 ते दुपारी 01:32 पर्यंत
 
या प्रकारे करा गणपतीची स्थापना
श्रीगणेशाला आनंदाने आणि विधिवत घरात प्रवेश करावावा. गणेशाच्या आगमनापूर्वी घर आणि दरवाजा सजवावे आणि ते जिथे गणपतीची स्थापना करायची असेल ती जागा स्वच्छ करून पूजेसाठी तयार करावी.
 
गणपती आणण्यासाठी जाण्यापूर्वी नवीन वस्त्र धारण करावे, डोक्यावर टोपी किंवा साफा घालावा. पितळ किंवा चांदीचं ताम्हण सोबत न्यावं. लाकडी पाट देखील सोबत घेऊन जाऊ शकता. त्यावर गणेशाची मूर्ती विराजित करुन घरात प्रवेश करावं. सोबत घंटा किंवा इतर वाद्य यंत्र घेऊन जावे. बाजारात गणपती घेताना मोलभाव करु नये. त्यांना आमंत्रित करुन दक्षिणा द्यावी. नंतर गणपतीची मूर्ती वाजत-गाजत आणावी आणि घरात प्रवेश करण्यापूर्वी दारावर आरती ओवाळावी. मंगल गीत तसंच मंत्रांचे उच्चारण करावे.
 
यानंतर गणपतीची मूर्ती स्थापित करण्यापूर्वी ईशान कोपरा स्वच्छ करुन कुंकुाने स्वस्तिक तयार करावे आणि हळदीने चार ठिपके काढावे. नंतर अक्षता ठेवून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावे. त्यावर लाल, पिवळा, किंवा केशरी रंगाचं आसान घालावं. त्याला चारी बाजूने फुलं आणि आंब्याच्या पानांनी सजवावं आणि पाटासमोर रांगोळी काढावी. तांब्याच्या कळशात पाणी भरुन त्यावर नारळ ठेवावं.
 
 जवळपास सुवासिक उदबत्ती, आरतीची थाळ, आरती पुस्तक, प्रसाद सर्व वस्तूं ठेवून घ्यावं. आता कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन ॐ गं गणपतये नमः चा उच्चारण करत मूर्तीला पाटावर विराजित करावं. आता विधीपूर्वक पूजा करुन आरती करावी आणि प्रसाद वितरित करावा.