गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (18:59 IST)

हरतालिका व्रत नियम पाळल्यास नक्की फळ प्राप्ती होईल

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी स्त्रिया महादेव आणि पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात. सुवासिनींसह विवाह योग्य मुली योग्य वर प्राप्तीसाठी हे व्रत अगदी भक्तीभावाने करतात. म्हणूनच याचे काही खास नियम आम्ही आपल्याला सांगत आहोत ते व्रत करणार्‍यांनी जाणून घेणे आवश्यक आहे-
 
हरतालिका तृतियाचा उपवास करणाऱ्या प्रत्येक स्त्रीने रात्री जागरण करायचे आहे याची काळजी घ्यावी. या व्रतात रात्रभर जागरण केले जाते आणि महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. असे म्हणतात की जर उपवासाच्या दिवशी कोणी झोपले तर पुढील जन्मात तो अजगर म्हणून जन्म घेतो.
 
असे मानले जाते की हरतालिका तृतियाचे व्रत आहार आणि पाण्याशिवाय केले जाते. जर एखाद्या स्त्रीने या दिवशी काही खाल्ले तर तिला पुढील जन्मात माकडाचा जन्म येतो.
 
हा धार्मिक विश्वास आहे की जर तुम्ही एकदा हरतालिका व्रत सुरू केले तर तुम्ही ते जन्मभर सोडू शकत नाही. तुम्हाला दरवर्षी हरतालिकेचं व्रत ठेवावे लागेल.
 
असे म्हणतात की या उपवासादरम्यान पाणी पिण्याने पुढील जन्मात मासे म्हणून जन्माला यावं लागतं.
 
या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी स्वतःला रागापासून दूर ठेवावे. असे म्हटले जाते की हरतालिकेच्या उपवासात महिलांनी स्वतःवर संयम ठेवावा. अजिबात राग नसावा.
 
हरतालिकेचे व्रत पाळणाऱ्या महिलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी वृद्धांची विशेष काळजी घ्यावी. एवढेच नाही तर तुमच्यापेक्षा लहान मुलांबरोबर देखील आदाराने वागावं, अपशब्द वापरू नये.
 
उपवासाच्या दिवशी पतीशी भांडणही करू नये. शक्य असल्यास, विवादांच्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका आणि गोष्टींकडे दुर्लक्ष करा. नंतर, एकत्र बसून प्रेमाने गोष्टींचा सुरळीत कराव्या.