पेण येथे 'चिमण्या गणपती'चे मंदिर आहे. पेण-खोपोली रस्त्यावर भव्य मंदिर असून आळीकरांनी वर्गणी गोळा करून ते बांधले आहे. मंदिरात चतुर्थी, गणेशजन्म, भाद्रपद चतुर्थी, गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, होलीकोत्सव हे सण मोठ्या उत्सवात साजरे केले जातात.
चिमण्या गणेशाचा गाभारा छोटासा परंतु देखणा आहे. चर्तुभुज गणेश मुर्ती भाविकांचे लक्ष आकर्षीत करत असते. मुर्ती ही डाव्या सोंडेची आहे. नवसाला पावणारा गणराया म्हणून परिसरात चिमण्या गणपती प्रसिध्द आहे.