पर्वतावरील देखणा घाटातला गणेश
जुन्नर तालुका हा ऐतिहासिक आणि पौराणिक स्थळांचा खजिना. जुन्नरपासून अवघ्या 12 किलोमीटरवर असणार्या हडसर उर्फ पर्वतगडावरील देखण्या बाप्पाचं दर्शन आवर्जून घ्यायला हवं. गडावरील भगवान शंकरांच्या मंदिरात गणरायाची ही देखणी मूर्ती विराजमान झालेली आहे. चतुर्भुज, शेंदूरचर्चित गणरायांच्या मागील दोन्ही हातांत परशू आहे. चारही हात आणि पायांमध्ये माळा आहेत. मुकुटावरही माळेची नक्षी आणि नागाच्या फणा कोरण्यात आल्या आहे. गडाची कातळकोरीव वाट आणि बाप्पांचं इथे घडणारे दर्शन सुखावून जाते.
सिंहगडाच्या घाटात अकरा हजाराचा टप्पा म्हणून वळण ओळखलं जातं, तिथे एका झाडाखाली असणारी वैशिष्टयेपूर्ण मूर्ती लक्ष वेर्धन घेते. रस्त्याचं काम सुरू असताना ही मूर्ती तिथे मिळाल्याचं सांगितलं जातं. तिथेच झाडाखाली तिची स्थापना करण्यात आली आहे. गणरायाच्या हातातील शस्त्र, गळ्यातील माळ ओळखू येते. घाटरस्त्यानं गडावर जाताना अवचित येणारा उदबत्तीचा सुगंध आणि गणेशदर्शन मनाला सुखावून जातं.
कोराईगडाच्या कुशीतला बाप्पा