सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 21 मे 2014 (11:52 IST)

पीएओ ट्विटर अकाउंट भाजपने ठरवले अनैतिक

केंद्रात भाजपचे सरकार स्थापन होणार असलन नरेंद्र मोदी हे देशाचे भावी पंतप्रधान असणर आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह याचे कार्यालय 'पीएमइंडिया' या ट्विटर अकाऊंटचा  वापर करीत होते. मात्र भाजपने कथित ट्‍विटर अकाउंट अनैतिक ठरवले आहे. त्यानंतर हे अकाउंट ‍डिलिट करण्‍यात आले आहे.

'पीएमइंडिया' हे अकाउंट डिलिट झाल्यानंतर एका कैसर अली नावाच्या व्यक्तीने या खात्याला आपल्या नावावर रजिस्टर केले आहे. जुने अकाउंट आर्काइव्हीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान म्हणून नवीन खाते जेव्हा तयार होईल तेव्हा जुने खाते @पीएमइंडिया अर्काइव्हीवर वर उपलब्ध असणार आहे.

ट्विटर खाते डिलीट करण्याची काय गरज होती? असा प्रश्न भाजपकडून उपस्थित करण्यात येत आहे. PMO ट्विटर अकाउंट कोणा एका व्यक्तीचे नसून ते कार्यालयाचे आहे. त्या अकाउंटवर कोणत्याही व्यक्तीचा अधिकार नसतो. असे असताना कोणी आणि का या खात्याला डिलीट केले, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.