सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: पुणे , गुरूवार, 22 मे 2014 (11:02 IST)

अजित पवारांना घरचा आहेर; बेहल यांची टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना पिंपरी चिंचवडचे पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बेहल यांनी घरचा आहेर दिला आहे. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सपाटून मार खाल्याने बेहल यांनी अजित पवारांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

दादांचे निर्णय चुकलेच; अशा शब्दात बेहल यांनी अज‍ित पवार यांना घराचा आहेर दिला आहे. नगरसेवकांनी पक्षाला दगा दिला असताना अजित पवार यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज होती. पण दादांनी कसलीही कारवाई केली नाही, त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असल्याचे मत योगेश बेहल व्यक्त केले आहे.