गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 14 मे 2014 (10:28 IST)

एनडीए 290-305 जागा मिळतील- अमित शहा

16 लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 290 ते 305 जागा मिळतील, असा विश्‍वास नरेंद्र मोदींचे विश्‍वासू अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. भाजपला उत्तर प्रदेशात 45-50 तर महाराष्ट्रात 35 जागा मिळतील असेही शहांनी सांगितले. एक्झिट पोल भाजपच्या सत्तेच्या दिशेने कौल दिला आहे. एक्झिट पोलचे निष्कर्ष तंतोतंत खरे ठरती असे शहा यांनी सांगितले.

शहा म्हणाले, संपूर्ण निवडणूक प्रचार भाजप व मोदींच्या बाजूने झुकलेला होता. त्यामुळे देशात भाजप आघाडीला बहुमताला लागणार्‍या 272 पेक्षा जास्त म्हणजे 290 च्या पुढेच जागा मिळतील. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीला 35 जागा मिळतील. ही निवणूक देशासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचेही शहा यांनी सांगितले.