गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 14 मे 2014 (12:15 IST)

नव्या सरकारमध्ये कोणत्या नेत्याला मिळेल कोणते पद?

बहुतांश एक्झिट पोलने भाजपच्या सत्तेच्या बाजुने कौल दिला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्ताखाली केंद्रात सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास सगळ्याच एक्झिट पोलने भविष्यवाणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. याबाबत गुजरातमधील गांधीनगरमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची आज (बुधवार) बैठक होत आहे.

एनडीएच्या संभाव्य कॅबिनेटमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. राज्‍यसभेचे विरोधीपक्ष नेता अरुण जेटली यांना नव्या सकरकारमध्ये अर्थमंत्री, राजनाथ सिंह यांनी गृहमंत्री, लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज यांना चार सर्वोच्च मंत्रालयांपैकी एक मिळण्याची शक्यता आहे. राजनाथ सिंह जर गृहमंत्री झाले तर सुषमा यांना यांना संरक्षण मंत्रीपद मिळू शकते. दुसरीकडे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्‍यक्ष नितीन गडकरी यांनाही संरक्षण मंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहे. गडकरींनी जर संरक्षण मंत्रीपदाचा हट्ट धरला तरी सुषमा स्वराज यांना परराष्ट्र मंत्रालय देण्याची शक्यता आहे. वकील रविशंकर प्रसाद यांच्याकडे कायदा मंत्रालय देण्याची शक्यता आहे. सुरेश प्रभु यांना ऊर्जा मंत्रालय ‍मिऴू शकते. मेट्रो प्रकल्पासाठी प्रसिद्ध असलेले श्रीधरन यांना रेल्वे मंत्रालय तर नरेंद्र मोदींचे विश्वासू अमित शहा यांना पीएमओमध्ये राज्यमंत्रीपद मिळू शकते.