शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

पालक खांडवी

साहित्य : 1 वाटी बेसन, 1 वाटी दही, दीड वाटी पाणी, 1/2 वाटी पालकाची पेस्ट, 1 चमचा आलं, लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट, 1 चिमूट हिंग, मीठ चवीनुसार. 

फोडणीचे साहित्य : 1 मोठा चमचा खोबऱ्याचा बुरा, 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 लहान चमचा तिखट.

कृती : सर्वप्रथम बेसनात दही मिसळावे. नंतर त्यात मीठ, पाणी व इतर साहित्य घालून चांगल्याप्रकारे एकजीव करावे, त्यात गोळे नाही पडले पाहिजे. या मिश्रणाला कढईत घालून घट्ट होईस्तोर चांगले हालवावे. एका ताटात थोडासा घोळ घालून पसरवावे व दोन-तीन मिनिटाने त्याचे रोल तयार करावे, जर रोल आरामात बनले तर समजावे खांडवी तयार आहे. नंतर ताटात किंवा गॅसच्या ओट्यावर ते मिश्रण 1-1 इंचेच्या पातळ स्ट्रिपमध्ये पसरवावे. आता या मिश्रणाचे रोल तयार करावे. गरम तेलात मोहरी व तिखट घालून त्याची फोडणी तयार करून ती त्या रोलावर टाकावी. वरून खोबऱ्याचा बुरा घालून सर्व्ह करावे.