शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By वेबदुनिया|

रामानुजाचार्य व शठकोपस्वामी

रामानुजाचार्य शठकोपस्वामींचे शिष्य होते. स्वामींनी रामानुजांना ईश्वरप्राप्तीचे रहस्य सांगितले. मात्र ते कुणालाही सांगू नको, असे बजावले होते, पण रामानुजांनी आपल्या गुरुंची ही आज्ञा मानली नाही. गुरूंनी जे ज्ञान दिले, ईश्वरप्राप्तीचचा जो मार्ग सांगितले होता, ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना देण्यास प्रांरभ केला. शठकोपस्वामींना हे जेव्हा कळले, तेव्हा ते फार संतापले. रामनुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले, 'माझी आज्ञा मोडून तू साधनेचे रहस्य प्रगट करत आहेस हा अधर्म आहे. पाप पाहे. याचा परिणाम काय होईल तुला ठाऊक आहे का.'

रामानुज नम्रपणे म्हणाले, गुरुदेव, गुरुंची आज्ञा मोडल्यास शिष्याला नकरात जावे लागते. शठकोपस्वामींनी विचारले, हे तुला ठाऊक असतांना सुद्धा तू जाणूनबुजून असे का केलेस.

यावर रामानुजन म्हणाले, वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कदी स्वार्थ आठवतो का, मी जे काही केले, त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण व्हावे, लोकांनासुद्दा ईश्वरप्राप्तीचा आनंद मिळावा, असाच आहे. यासाठी मला नरकात जावे लागले, तर मला त्याचे मुळीच दु:ख होणार नाही.

ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहन स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी रामनुजांना पोटाशी धरले. त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि लोकांत खर्‍या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले.