सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जुलै 2020 (09:03 IST)

Guru Dakshina महत्व, कधी आणि कशा प्रकारे दिली जाते गुरु दक्षिणा

- ओशो 
हिंदू धर्मात गुरु दक्षिणेचं खूप महत्व मानले गेले आहे. गुरुकुळात शिक्षण घेतल्यावर शेवटी शिष्य आपल्या घरी जाताना गुरुदक्षिणा द्याची परंपरा असायची. गुरु दक्षिणा म्हणजे कोणतीही संपत्ती नाही. हे त्यांचा गुरूवर अवलंबून असतं की ते आपल्या शिष्याकडून कोणत्या प्रकाराची गुरु दक्षिणा घेणार. 
 
गुरु आपल्या शिष्याची परीक्षाच्या रूपात गुरु दक्षिणा देखील मागून घेतात. कित्येकदा गुरु दक्षिणेत शिष्याने गुरूला तेच दिले जे त्यांनी मागितले. गुरूंच्या आज्ञेचे पालन करणं शिष्याच्या जीवनाचे कर्तव्य असतात आणि कित्येकदा तर हे त्यांचा जीवन आणि मृत्यू प्रश्न देखील बनतात. 
 
गुरु दक्षिणा हे गुरूबद्दलचे आदर आणि समर्पणाचे भाव आहे. गुरूच्या बद्दलची खरी दक्षिणा हीच आहे की गुरुची इच्छा असते की त्यांचा शिष्याने आता गुरु व्हावं. मुळतः गुरु दक्षिणेचा अर्थ शिष्याच्या परीक्षेच्या संदर्भात घेतात. गुरुदक्षिणा त्या वेळी देतात किंवा गुरु घेतात ज्यावेळी शिष्यामधे पूर्णता येते. म्हणजे ज्यावेळी शिष्य गुरु होण्याचा मार्गावर असतो. गुरु कडील सर्व ज्ञान शिष्य ग्रहण करतो आणि आता गुरु कडे त्याला देण्यासाठी काहीच शिल्लक नसतं तेव्हा गुरुदक्षिणा अर्थपूर्ण होते. 
 
अर्जुन आणि द्रोणाचार्य : द्रोणाचार्याला रणांगणावर जेव्हा अर्जुनाने आपल्या समोर एका प्रतिस्पर्धीच्या रूपात बघितल्यावर त्यांनी लढण्यास नकार दिला. हे अर्जुनाच्या शिष्याच्या रूपात द्रोणाचार्यांसाठी प्रेम आणि आदराची भावना होती. 
 
एकलव्याची गुरुदक्षिणा : त्याच प्रकारे जेव्हा एकलव्याशी गुरु द्रोणाचार्याने प्रश्न केले की आपले गुरु कोण आहे, तेव्हा त्याने उत्तर दिले - गुरुदेव आपणच माझे गुरु आहात आणि आपल्याच कृपेने आपल्या मूर्तीला मी गुरु मानून धनुर्विद्या शिकलो आहोत. तेव्हा द्रोणाचार्याने म्हटलं - बाळ तर मग तुला मला गुरु दक्षिणा द्यावी लागणार. 
 
एकलव्य म्हणे - गुरुदेव आपण आज्ञा करा मी गुरु दक्षिणा देण्यास तयार आहे. तेव्हा गुरु द्रोणाचार्याने एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला. एकलव्याने आनंदाने आपला अंगठा कापून गुरूच्या चरणी अर्पित केला. हे केल्याने एकलव्याचे काहीही नुकसान झाले नाही पण त्याची कीर्ती सर्वत्र पसरली आणि एकलव्य एक ऐतिहासिक पुरुष झाला. 
 
गुरुचे प्रेम दिसायला कठोर असले तरी ही ते आपल्या शिष्याला इजा होऊ देत नाही. गुरुचे सारे जीवन आपल्या शिष्याला योग्य बनविण्यात लावतात, तर दुसरं कर्तव्य आहे शिष्याचं आणि ते आहे गुरु दक्षिणा देण्याचं. 
 
विवेकानंद आणि शिवाजी महाराजांची गुरु दक्षिणा : विवेकानंद यांनी आपल्या गुरूच्या आदेशानुसार संपूर्ण जगात सनातन धर्माचा प्रचार केला. छत्रपती शिवाजी आपल्या गुरूच्या आदेशानुसार सिंहनीचे दूध काढून घेऊन आले होते आणि गुरुदक्षिणा म्हणून अवघ्या महाराष्ट्राला जिंकून आपल्या गुरूंच्या चरणी ठेवले होते. 
 
कृष्ण व बलदेव यांची गुरु दक्षिणा : कृष्ण आणि बलदेव यांनी सांदिपनी आश्रमात काहीच महिन्यात सर्व प्रकाराची शिक्षा ग्रहण केली होती. तत्पश्चात गुरु दक्षिणा देण्याची वेळ आली होती. गुरूने कृष्णाला त्यांचा मुलास आणून देण्याचे सांगितले ज्याला काही दिवसांपूर्वी मगर गिळून गेला होता. कृष्णाने आपल्या गुरूस त्याचा मुलासाठी दुखी बघून त्यांचा मुलाला आणून देण्याची प्रतिज्ञा घेतली आणि कृष्ण आणि बलरामाने यमपुरात जाऊन यमराज कडून त्याचा मुलाला वापस आणून दिले.
 
अंगुलीमान डाकू : हे देखील बुद्धाचे प्रभाव होते की अंगुलीमान सारखा दरोडेखोर देखील संन्यासी बनला. असेच असतात गुरुचे सामर्थ्य. 
 
ज्या प्रमाणे चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला, समर्थ रामदासाने छत्रपती शिवाजींना आणि रामकृष्ण परमहंसाने विवेकानंदाना शोधले होते त्याच प्रकारे जर आपण योग्य शिष्य असल्यास आपल्याला गुरु शोधण्याची गरजच नाही. गुरु स्वतःच आपल्याला शोधतील.
 
आपण तयार राहा दक्षिणा देण्यासाठी. म्हणजे आपल्या सर्व अहंकार, अभिमान, ज्ञान, अज्ञान, पद आणि सामर्थ्य सर्व गुरूंच्या चरणी अर्पण करावं. हीच खरी गुरुदक्षिणा होय.