शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (22:33 IST)

Guru Purnima Wishes in Marathi गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… 
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः 
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गुरु जगाची माऊली, सुखाची सावली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
आधी गुरुसी वंदावे,
मग साधन साधावे,
गुरु म्हणजे माय बापं
नाम घेता हरतील पापं,
गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा!
 
गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,
लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गुरुविण कोण दाखविल
वाट हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,
अवघड डोंगर घाट, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
गुरूविण न मिळे ज्ञान, 
ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. 
जीवन भवसागर तराया, 
चला वंदु गुरूराया.. 
जे जे आपणासी ठावे, 
ते दुसर्यासी देई, 
शहाणे करून सोडी, 
सकळ जना.. 
तो ची गुरू खरा, 
आधी चरण तयाचे धरा.. 
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गुरू म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, 
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, 
जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, 
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, 
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
होतो गुरु चरणाचे दर्शन,
मिळे आनंदाचे अंदन,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, 
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गुरुशिवाय ज्ञान नाही,
ज्ञानशिवाय आत्मा नाही,
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,
सगळी आहे गुरुची देन,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,
ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे, 
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,
गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!