1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (13:17 IST)

अंजनी पोटी जन्म घेतला..

अंजनी पोटी जन्म घेतला,
रुद्राचा अवतार पोटी जन्मला,
भीम पराक्रमी रूप जयाचे,
राम वसें सदा हृदयी तयाचे,
राम दास म्हणवुनी तू घेशी,
सुवर्ण लंका पेटवून दावीशी,
पर्वत उचलुनीया दाविली भक्ती,
माळ मोतीयाची फोडून बघती,
वानर रूप तुझे हे भगवंता सुंदर,
आहे वास तुझा धरतीवर निरंतर,
दे गा दर्शन मज तू एकवार प्रभो,
कृपादृष्टी तुझी सगळ्यांनाच लाभो!
....!!जय श्री राम !!....
अश्विनी थत्ते.