शुक्रवार, 19 जुलै 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (15:21 IST)

हनुमान जयंती 2021 : 27 एप्रिलला Hanuman Jayanti, जाणून घ्या शुभ मुहूर्त

भगवान हनुमानाला महादेवांचा 11 व्या अवतार मानलं गेलं आहे. हनुमानाची पूजा केल्याने आणि व्रत ठेवल्याने जीवनातील प्रत्येक संकट दूर होतं, म्हणून हनुमानाला संकटमोचन म्हटले गेले आहे.
 
27 एप्रिल रोजी हनुमान जयंती
यंदा वर्ष 2021 मध्ये हनुमान जयंती 27 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. 
 
हनुमानाला मंगलदायक म्हटलं गेलं आहे, यांची पूजा केल्याने जीवनात मंगळ घडतं. यंदा 27 एप्रिल रोजी हा दिवस असून विशेष बाब म्हणजे हनुमान जयंती मंगळवारी आली आहे. अर्थात हा ‍दिन हनुमान भक्तीसाठी अत्यंत शुभ असल्याचे मानलं जातं आहे. या दिवशी रात्री 8 वाजता सिद्धी योग बनत आहे आणि अत्यंत शुभ स्वाती नक्षत्र देखील. कोणत्याही प्रकारे सिद्धी प्राप्त करणे आणि ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी सिद्धी योग उत्तम असल्याचं म्हटलं जातं.
 
हनुमान जयंतीच्या दिवशी सिद्धी योग संध्याकाळी 08 वाजून 3 मिनिटापर्यंत राहील. यानंतर व्यतिपात लागेल. या दिवशी स्वाती नक्षत्र संध्याकाळी 08 वाजून 8 मिनिटापर्यंत राहील. नंतर विशाखा नक्षत्र लागेल.
 
श्री हनुमान जयंती
शुभ मुहूर्त
27 एप्रिल 2021
 
26 एप्रिल 2021: दुपारी 12.44 मिनिटापासून पौर्णिमा तिथी आरंभ
27 एप्रिल 2021: रात्री 9.01 मिनिटावर पौर्णिमा तिथी समाप्त
 
हनुमान जयंती शुभ मुहूर्त
 
ब्रह्म मुहूर्त- प्रात: 04:06 ते 04:50 पर्यंत
अभिजीत मुहूर्त- 11:40 ते 12:33 पर्यंत
अमृत काल- 12:26 ते 01:50 पर्यंत
विजय मुहूर्त- 02:17 ते 03:09 पर्यंत
गोधूलि मुहूर्त- 06:26 ते 06:49 पर्यंत
त्रिपुष्कर योग- 05:14 ते 05:33 पर्यंत
निशिता मुहूर्त- रात्री 11:44 ते 12:28 पर्यंत
 
हनुमानाचा जन्म सूर्योदयावेळी झाला होता, म्हणून या दिवशी ब्रह्म मुहूर्तात पूजा करणे शुभ मानले गेले आहे.
 
- हनुमानाला प्रिय वस्तूंचा नैवेद्य दाखवावा.
 
- हनुमान जयंतीला हनुमान चालीसा, सुंदरकांड आणि हनुमान आरती पाठ करणे शुभ मानले गेले आहे.