1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

धर्मशास्त्रात काही समज-गैरसमज

आपला महत्त्वाचा सण म्हणजे दसरा होय. अनेक ठिकाणी दसर्‍याचे नवरात्र असते ते म्हणजे अश्विन महिना. नवरात्रात घरात देवी बसविल्यानंतर तिला तेथून न काढता फुलांनी पाणी शिंपडून तेथेच पूजा करावी. मात्र इतर देव नेहमीप्रमाणे काढून ताम्हणात घेऊन त्यांची पूजा करावी. प्रकृती स्वास्थामुळे जर उपवास करणे शक्य नसेल तर धान्य फराळ करावा. आमचे गुरु प. पू. नाना महाराज म्हणात की उपवासापेक्षा उपासना वाढवा. नवरात्रात कठीण वेळ आली तर उपवास बंद न करता नातेवाईकांकडून पूजा करवून घ्यावी. 

मात्र सप्तशतीचे पाठ सुरू असतील तर ते बंद करावे. नंतर राहिलेले पाठ पूर्ण करावेत. नवरात्रात अखंड दीप लावला जातो पण हवेमुळे किंवा काळजी धरल्यामुळे किंवा रात्री तेल संपल्यामुळे जर दिवा विझला तर तो अशुभ नाही. मनात कोणतीही शंका आणू नये.

अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मी पूजन करताना (घागरी फुंकणे) रात्री साडेबारा ते दीड ही वेळ घ्यावी. दसरा किंवा गुडीपाडवा हे साडेतीन मुहुर्तांपैकी एक असला तरी वास्तुविवाह कार्यासाठी वर्ज्य समजावेत. मुहूर्त नसेल तर राहावयास जावे व नंतर वास्तू करावा. यासाठी उदक शांती हा पर्याय सांगितला आहे पण त्याला काही शास्त्रीय आधार आहे, असे मला वाटत नाही. आता आपण महत्वाचे म्हणजे शांती प्रकरणावर विचार करू. जन्म झाल्यास शांती बाराव्या दिवशी न झाल्यास नंतर तेच नक्षत्र पाहून त्या दिवशी अग्नी पहून शांती करता येते. इतर कुयोगाच्या शांती बाराव्या दिवशी न झाल्यास ते योग नसताना करू नये. म्हणजे वैघृती व्यतीपात, आमावस्या वगैरे इतर शुभ दिवशी पंचांग पाहून कराव्यात.

गौरीपुढे नैवेद्य ठेवल्यानंतर तो दिवसभर तसाच ठेवून दुसर्‍या दिवशी घेऊ नये. एकदा देवाला नैवद्य सर्मपण केल्यानंतर तो आपल्याला घेता येतो. जर आपल्या घरी आपल्याला पहिल्यांदाच गौरी पूजन करावयाचे असेल तर केव्हाही करता येते. त्यासाठी घरी शुभ कार्येच झाले पाहिजे असे नाही. जर आपण एखादा नवस बोलला असेल आणि त्याप्रमाणे जर घडले उदा. एखाद्या घरी नवीन बाळ आले म्हणजे ते मांडेल असा नवस बोलला असेल तर असे बाळ आणून तो मुखवटा पहिल्या वर्षी राशीवर मांडावा.

जर विर्सजनाचा मुहूर्त लवकर असेल तर दुपारीच पूजा झाल्यानंतर देवावर अक्षता टाकून घ्याव्या व रात्री आपल्या सोयीने ते मुखवटे उतरावे. आणखी एक गैरसमज म्हणजे उपवसाच्या दिवशी ‍‍किंवा एकादशीला सत्यनारायण करू नये. देवाला कधीच उपवास नसतो. देवाला शिरार्‍या नेवैद्य दाखविल्यानंतर आपण तो प्रसाद म्हणून उपवास असला तरी घेऊ शकतो.

मुरलीधर सरदेशपांडे
नागपूर