गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (17:27 IST)

अंगारकी संकष्टी चतुर्थी : या दिवशी केलेली गणेशपूजा आजार दूर करते

धार्मिक श्रद्धांमध्ये संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी जो कोणी गजानाची विधीपूर्वक पूजा करतो, श्रीगणेश त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. अशात संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्यास याला अंगारक चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.
 
या अंगारक चतुर्थीच्या व्रतामध्ये गणेश आणि चंद्राच्या पूजेबरोबरच मंगलचीही पूजा केली जाते. शास्त्रानुसार मंगळ ग्रहाची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते. अंगारक चतुर्थीच्या व्रतामध्ये मंगल पूजन केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. या दिवशी शिवलिंगाला लाल चंदन, लाल फुले आणि गुलाल अर्पण करावा. या चतुर्थीच्या व्रतामध्ये लाल रंगाचे कपडे घालावेत. यासोबतच शिवलिंगावर फळांच्या रसाने अभिषेक करावा.
 
हिरव्या रंगाशिवाय लाल रंगही गणेशाला प्रिय आहे, असे मानले जाते. त्यामुळे गणेशपूजनात लाल फुलांचा वापर करावा. गणेशाची पूजा करताना जास्वंदाच्या फुलाचा वापर करू शकता. असे मानले जाते की या फुलाने गणेशजी लवकरच प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. तसेच मंगळवारी देवाला झेंडूचे फूल अर्पण करावे.
 
या दिवशी पहाटे लवकर आंघोळ करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेसाठी घर स्वच्छ करावे आणि व्रताचे संकल्प घ्यावे.
यानंतर देवतांना गंगाजल अर्पण करून स्नान करावे. फुले अर्पण करावीत.
गणेशाला सिंदूर अर्पण करावं आणि जप करावं. 
या दिवशी गणपतीला लाडू किंवा मोदक यांसारख्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात.
यासोबतच दुर्वा जोडीही अर्पण कराव्या. 
देवाची आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा.