सोमवार, 3 ऑक्टोबर 2022
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified सोमवार, 18 एप्रिल 2022 (16:33 IST)

Angarki Sankashti Chaturthi अंगारकी संकष्टी चतुर्थी सोपी पूजन विधी

Angarki Sankashti Chaturthi पौराणिक माहितीनुसार गणपतीने अंगारक (मंगळ देव) यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिले होते की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी तिथी येईल ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. म्हणून अंगारकी चतुर्थीला श्री गणेश पूजनाचे खूप महत्त्व आहे.यहां पढ़ें आसान पूजा विधि-
 
Angarki Sankashti Chaturthi Puja Vidhi सोपी पूजन विधी
श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे.
यानंतर घरातील मंदिरातील गणेश मूर्तीला गंगाजल आणि मधाने स्वच्छ करावी.
सिंदूर, दुर्वा, फुले, तांदूळ, फळे, जनेयू, प्रसाद इत्यादी वस्तू पूजेसाठी गोळा कराव्या.
धूप- दीप लावावे.
'ॐ गं गणपते नमः या मंत्राचा जप करून पूजा करावी. मंत्राचा 108 वेळा जप करावा.
श्रीगणेशासमोर व्रत करून दिवसभर अन्न न खाण्याचे संकल्प घ्यावे.
उपवासात फळे, पाणी, दूध, फळांचा रस इत्यादींचे सेवन करता येते.
गणपती स्थापनेनंतर अशी करा पूजा-
सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर पूजेचे संकल्प घ्यावे.
त्यानंतर गणेशाचे ध्यान करून त्यांचे आवाहन करावे.
यानंतर गणेशाला स्नान घालावे.
प्रथम पाण्याने नंतर पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण) आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावे.
गणेशाचे मंत्र आणि चालीसा, स्तोत्र इत्यादी पठण करावे.
आता गणेशाला वस्त्र अर्पण करावे. जर वस्त्र नसतील तर तुम्ही त्यांना नाडा देखील अर्पण करु शकता.
यानंतर गणपतीच्या मूर्तीवर सिंदूर, चंदन, फुले आणि फुलांच्या माळा अर्पण कराव्या.
आता बाप्पाला एक सुंदर सुगंधी उदबत्ती दाखवा.
आता दुसरा दिवा लावावा आणि गणपतीची मूर्ती दाखवावा.
आता नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात मोदक, मिठाई, गूळ आणि फळे यांचा समावेश होतो.
यानंतर गणपतीला नारळ आणि दक्षिणा अर्पण करावी.
गणपतीची आरती करावी. गणेशाची आरती कापूरसह तुपात बुडवून एक किंवा तीन किंवा अधिक वाती बनवून केली जाते.
यानंतर हातात फुले घेऊन गणपतीच्या चरणी पुष्प अर्पण करावे.
आता गणपतीची प्रदक्षिणा घालावी. गणपतीची प्रदक्षिणा एकदाच केली जाते हे लक्षात ठेवा.
यानंतर गणपतीकडे काही चूक झाली असल्यास माफी मागावी.
पूजेच्या शेवटी साष्टांग नमस्कार करावा.
पूजेनंतर घरातील गरजू लोकांना पैसे आणि धान्य दान करा.
गाईला रोटी किंवा हिरवे गवत द्यावे. तुम्ही कोणत्याही गोठ्यात पैसे दान करू शकता.
रात्री चंद्र पाहून पूजा करून हे व्रत मोडावे.
संध्याकाळी, चंद्र बाहेर येण्यापूर्वी, पुन्हा एकदा गणपतीची पूजा करा आणि संकष्टी व्रत कथा पाठ करा. नंतर उपवास सोडावा.