सोमवार, 11 डिसेंबर 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2023 (15:26 IST)

आज आहे दीप पूजा, अती पवित्र

diya
आज आहे दीप पूजा, अती पवित्र,
अंधारा कडून उजेडात प्रवास उद्देश मात्र,
माते करवी अपत्याच्या मंगला ची प्रार्थना,
शुभ संकेत मिळो त्याला सदा, हीच मनोकामना,
वंश वृद्धी व्हावी अन पुढं पुढं तो वाढावा,
अन आपल्या कुळाचा नित्य उद्धार व्हावा!
नृसिंह अन कृष्ण देवता ही करतील रक्षण बालकांचे,
दीर्घायु प्रदान करून, व्यक्तिमत्त्व सुधारतील त्यांचे,
अहंकार आहे शत्रू मोठा मानवाचा,
मार्ग दावून चांगला, गुरू करील अंत अहंकाराचा!
म्हणोनी घरोघरी करतात पूजा जिवतीची,
हीच परंपरा आपुली, करावी जपणूक परंपरेची!
..अश्विनी थत्ते.