बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (14:50 IST)

भीष्म द्वादशी 2021: पूजा मुहूर्त, विधी आणि महत्त्व

माघ महिन्यातील द्वादशीला भीष्मद्वादशी म्हटले जाते. महाभारतात पितामह यांनी माघ शुद्ध अष्टमी रोजी आपला देह ठेवला. मात्र, त्यांची उत्तरक्रिया माघ शुद्ध द्वादशीला करण्यात आली. म्हणून या द्वादशीला भीष्म द्वादशी म्हटले जाते. याला गोविंद द्वादशी देखील म्हणतात.
 
द्वापारयुगात हस्तिनापूरवर राजा शंतनू आणि त्यांची पत्नी गंगा यांचे पुत्र म्हणजे देवव्रत. हे गंगापुत्र किंवा भीष्माचार्यां या नावाने देखील ओळखले जात. 
 
भीष्म द्वादशी पूजा मुहूर्त
भीष्म द्वादशी 24 फेब्रुवारी 2021 बुधवार रोजी तिथी आहे.
द्वादशी तिथी आरंभ - 23 फेब्रुवारी 2021, 18:06 पासून 
द्वादशी समाप्त - 24 फेब्रुवारी 2021, 18:07 पर्यंत.
 
भीष्म द्वादशी पूजा विधी
भीष्म द्वादशीला नित्य कर्मांपासून निवृत्त होऊन स्नान केल्यानंतर प्रभू विष्णूंची पूजा करावी.
सूर्य देवाची पूजा करावी.
तीळ, जल आणि कुश याने भीष्म पितामह यांच्या निमित्ताने तरपण करावे.
स्वयं तरपण करण्यास असर्मथ असल्यास एखाद्या योग्य ब्राह्मणाद्वारे हे कार्य करवावे.
ब्राह्मण भोजन करवावे आणि यथा शक्ती दान-दक्षिणा द्यावी.
या दिवशी आपल्या पूर्वजांना तरपण करण्याचे विधान आहे.
या दिवशी भीष्म कथा श्रवण केली पाहिजे. या दिवशी विधीपूर्वक पूजन केल्याने सर्व कष्टांपासून मुक्ती मिळते असे मानले गेले आहे.
या दिवशी पूजा केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पितृ दोषांपासून मुक्ती मिळते.
 
भीष्म द्वादशीला करा तीळ दान
भीष्म द्वादशीच्या दिवशी तीळ दान केल्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी तिळाचे हवन, अंघोळीच्या पाण्यात तिळ घालणे तसेच तीळ दान याचे महत्त्व आहे. तीळ दान केल्याने जीवनात सुख-आनंदाची प्राप्ती होते. यशाचे मार्ग मोकळे होतात.
 
या दिवशी तीळ सेवन करण्याचे देखील महत्तव आहे. हिन्दू धर्मात तीळ पवित्र, पापनाशक आणि पुण्यमय असल्याचे मानले गेले आहे. शुद्ध तिळांचे संग्रह करुन यथाशक्ति ब्राह्मणांना दक्षिणासह तीळ दान करावे. तीळ दान केल्याचे फल अग्निष्टोम यज्ञा समान असतात. तीळदान केल्याने गोदान केल्याचे देखील पुण्य लाभतं.